जंगलालगतच्या शेतांना जाळीचे कुंपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 06:00 AM2019-09-07T06:00:00+5:302019-09-07T06:00:30+5:30
या योजनेतंर्गत मागील दोन वर्षांपासून काम सुरू आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील शेकडो गावात लोखंडी जाळी लावण्याचे काम करण्यात आले आहे. या योजनेशिवाय सेंट्रल इंडिया टायगर कंजरवेशन प्रकल्पातंर्गत स्वंयसेवी संस्था सुध्दा जंगलाच्या सीमेलगत असलेल्या गावांच्या सीमेवर लोखंडी जाळी लावण्याचे काम करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांची संख्या वाढविण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाय योजना केल्या जात आहे. तर दुसरीकडे जंगलालगत असलेल्या गावांमध्ये मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष वाढत आहे.जंगलालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे हे नुकसान टाळून मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी जंगल आणि शेतालगत जाळीचे कुंपन तयार करण्याचे काम सुरू केले आहे. जिल्ह्यातील ७० गावात काम पूर्ण झाले असून पुन्हा काही गावांची निवड करण्यात आली आहे.
डॉ.शामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतंर्गत प्रायोगिक तत्त्वावर जंगला लगत असलेल्या संवेदनशिल गावांच्या सीमेवर लोखंडी जाळी लावण्यासाठी शासनाने २८ ऑगस्टला २०१९ ला ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.या योजनेतंर्गत मागील दोन वर्षांपासून काम सुरू आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील शेकडो गावात लोखंडी जाळी लावण्याचे काम करण्यात आले आहे. या योजनेशिवाय सेंट्रल इंडिया टायगर कंजरवेशन प्रकल्पातंर्गत स्वंयसेवी संस्था सुध्दा जंगलाच्या सीमेलगत असलेल्या गावांच्या सीमेवर लोखंडी जाळी लावण्याचे काम करीत आहे. वाईल्ड लाईफ ट्रस्ट इंडिया या स्वंयसेवी संस्थेने आत्तापर्यंत जिल्ह्यातील ६८ गावात लोखंडी जाळी लावण्याचे काम पूर्ण केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत झाली.
यासंदर्भात वन्यजीव विभागाचे अधिकारी एस.डब्ल्यू.सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ज्या ग्रामपंचायतीकडून लोखंडी जाळी लावण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करुन पाठविले जातात त्याच गावांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लोखंडी जाळी उपलब्ध करुन दिली जाते. सध्या यासंदर्भात गावांकडून प्रस्ताव मागविले जात असल्याचे सांगितले.
मुरपारटोली,लेंडेझरी येथील शेतकºयांनी केले श्रमदान
सडक अर्जुनी तालुक्यातील मुरपारटोली आणि लेंडेझरी येथील शेतकरी ऊसाची लागवड करतात.मात्र वन्यप्राण्यांकडून ऊसाच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने ते त्रस्त झाले होते. वाईल्ड लाईफ ट्रस्ट इंडियाचे व्यवस्थापक अनिल कुमार यांनी वन्यप्राण्यामुळे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी जाळी लावण्याचा प्रस्ताव ठेवला.त्यानंतर शेतकरी यासाठी तयार झाले. मुरपारटोली येथे २९.१७ हेक्टर आणि लेंडेझरी येथे ७१ हेक्टरवर लोखंडी जाळी लावण्यात आली.मुरपारटोली येथील २१ आणि लेंडेझरी येथील २७ शेतकºयांनी १५ टक्के प्रमाणे खर्च केला.तर वाईल्ड लाईफ ट्रस्ट इंडियाने या दोन्ही गावांसाठी ८ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च केला. जाळी लावण्यासाठी खड्डे तयार करण्याचे काम शेतकºयांनी श्रमदान करुन केले.
अधिक क्षमतेची बॅटरी लावा
डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतंर्गत जंगलाच्या सीमेलगत असलेल्या भागात पिकांचे संरक्षण करण्यासाठी लोखंडी जाळी लावून दिली जात आहे. यास अधिक क्षमतेची बॅटरी सुध्दा लावून दिली जात आहे. मात्र ती कमी क्षमतेची असल्याचे बोलल्या जाते.वाईल्ड लाईफ ट्रस्ट इंडियाकडून अधिक क्षमतेच्या बॅटºया लावून देण्यात आल्या आहे. यासाठी प्रती शेतकरी १६ ते १७ हजार रुपयांचा खर्च येतो. लोखंडी जाळीमध्ये सौम्य स्वरुपाचा विद्युत प्रवाह राहत असल्याने वन्यप्राण्यांकडून होणारे पिकांचे नुकसान टाळण्यास मदत होते.