कोरणीघाटावर महोत्सव
By admin | Published: February 16, 2017 12:48 AM2017-02-16T00:48:00+5:302017-02-16T00:48:00+5:30
कोरणीघाट पर्यटन बुद्धिस्ट समिती, गोंदियाच्या वतीने बुद्धिस्ट पर्यटन वार्षिक महोत्सव २०१७ पार पडला.
बौद्ध बांधवांचा जनसागर : धम्म प्रवचन, सिकलसेल शिबिरासह अनेक कार्यक्रम
खातीया : कोरणीघाट पर्यटन बुद्धिस्ट समिती, गोंदियाच्या वतीने बुद्धिस्ट पर्यटन वार्षिक महोत्सव २०१७ पार पडला. यात महाराष्ट्राच्या गोंदिया व मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सदर पर्यटन स्थळ लुंबिनी वन परिसर या नावाने प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्याच्या सीमेवर रजेगाव येथे वाघ नदीच्या काठावर असून, सुंदर व रमनीय ठिकाण आहे. येथे दरवर्षी वार्षिक महोत्सव साजरा केला जातो. यावर्षीसुद्धा वार्षिक महोत्सव साजरा करण्यात आला.
यात पूजा, वंदना, सामूहिक विवाह व धम्म प्रवचन कार्यक्रम घेण्यात आले. तसेच समाज प्रबोधनाचेही कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी तदंत डॉ. तिस्सवंस (पुणे), भदंत नागसेन (बालाघाट), भदंत बुद्धशील (गोंदिया), भदंत धम्मशिखर (बालाघाट) उपस्थित होते.
महोत्सवानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवनाचे उद्घाटन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते, कोरणीघाट समितीचे अध्यक्ष अॅड. एच.डी. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने डॉ.एन.व्ही. ढोके, विद्याधर बन्सोड, वामनराव सरकटे, माजी नगराध्यक्ष के.बी. चव्हाण, सरपंच रामलाल उके, इंदू गजभिये, संगीता तुरकर, सुकराम मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी गीत संगीत व भीमगीतांचे कार्यक्रम पार पडले. महोत्सवात आरोग्य प्रशासनाच्या वतीने सिकलसेलचे शिबिर घेण्यात आले. त्यात अनेकांनी सिकलसेल तपासणी करून घेतली.
महोत्सवात हजारो बौद्ध धम्म उपासक-उपासिका उपस्थित होत्या. सर्वांच्या मुखातून तथागत भगवान बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष सर्वत्र गुंजत होता. (वार्ताहर)