३४ गुणवंत विद्यार्थ्यांसह २० सहयोगी शिक्षकांचा सत्कार
By admin | Published: September 14, 2016 12:27 AM2016-09-14T00:27:01+5:302016-09-14T00:27:01+5:30
व्ही.पी. इन्स्टिट्युट व पब्लिकेशन साताराद्वारे सन २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय इंडियन टॅलेंट सर्च (आयटीएस) परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त करणारे
मान्यवरांचे मार्गदर्शन : इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत विद्यार्थ्यांचे सुयश
ेगोंदिया : व्ही.पी. इन्स्टिट्युट व पब्लिकेशन साताराद्वारे सन २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय इंडियन टॅलेंट सर्च (आयटीएस) परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त करणारे ३४ विद्यार्थी व २० सहयोगी शिक्षकांचा सत्कार शनिवारी निर्मल हायस्कूल रेलटोली येथे करण्यात आला.
अध्यक्षस्थानी आयटीएसचे विदर्भ प्रमुख संजय कुथे होते. अतिथी म्हणून पोलीस उपअधीक्षक रमेश बरकते, संचालक फादर डायनियल, आयटीएसचे जिल्हा प्रमुख एल.एस. तागडे, गोरेगाव तालुका प्रमुख पटले, गोंदिया तालुका प्रमुख चंद्रशेखर चव्हाण उपस्थित होते.
शहरी व ग्रामीण भागातील परीक्षेला बसलेल्या ४५० विद्यार्थ्यांपैकी गुणवत्ता प्राप्त ३४ विद्यार्थी व २० सहयोगी शिक्षकांचा सत्कार पोलीस उपअधीक्षक रमेश बरकते यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व ट्राफी देवून करण्यात आले. सदर परीक्षेत तिन्ही समुहात सुदामा हायस्कूल आसोली येथील वर्ग आठवीचा विद्यार्थी अमन निलचंद बिसेन याने प्रथम क्रमांक मिळविला.
इतर विद्यार्थ्यांमध्ये पल्लवी डोंगरे, साक्षी चव्हाण, रेखा सोनवाने, वैष्णवी निमकर, सितारा सोनवाने, पायल जतपेले, नेहा भेंडारकर, नेहा लांजेवार, चाहत बघेले, जयकिशोर कुर्वे, आकांशा हनवते, मीता फुले, पुनम बोरकर, नूतन हटवार, भूमेश गौतम, आतिशा आंबेडारे, मनिष येल्ले, प्रिया नागोशे, लीना पटले, दीक्षा रहांगडाले, विपूल पुसाम, शीतल कोडवते, रिशी पानोरे, भावना भेलावे, नेहा ठाकरे, सुप्रिया भेलावे, खुशबू रंगारी, शीतल हट्टेवार, लीना मडावी, कुणाल मोटघरे, अंजली कागदीउके, नंदिनी वालदे, दिव्यानी बन्सोड यांचा समावेश आहे.
याप्रसंगी मान्यवरांनी स्पर्धा परीक्षांबद्दल आपले अनुभव व स्पर्धा परीक्षांमध्ये विदर्भ का मागासलेला आहे, याबद्दल मार्गदर्शन केले. संजय कुथे यांनी आयटीएस संस्थेची उद्दिष्टे व कार्यपद्धती याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांचे भविष्यातील शिक्षण व त्यांचे करियर यावरही मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक चंद्रशेखर चव्हाण यांनी मांडले. संचालन स्वाती बोहरे यांनी केले. आभार वाय.एस. तागडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी देसाई, सर्व शिक्षक व निर्मल हायस्कूलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)