१३० हेक्टर पैकी १९ हेक्टरमध्येच रोवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 11:41 PM2017-11-07T23:41:59+5:302017-11-07T23:42:27+5:30
तालुक्यातील सर्वाधिक शेतकºयांनी कमी पावसामुळे यावर्षी आपल्या शेतात धान रोवणी केली नाही. अशा परिस्थितीची माहिती घेण्याकरिता जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी या भागाचा दौरा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : तालुक्यातील सर्वाधिक शेतकºयांनी कमी पावसामुळे यावर्षी आपल्या शेतात धान रोवणी केली नाही. अशा परिस्थितीची माहिती घेण्याकरिता जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी या भागाचा दौरा केला. तालुक्यातील १३० हेक्टर शेतीपैकी फक्त १९ हेक्टर शेतात रोवणी झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली.
तालुक्यातील फुटाणा, बोरगाव/बाजार व भर्रेगाव या गावात भेट देवून शेतकºयांशी दुष्काळाविषयी त्यांनी चर्चा केली. शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे शेतकºयांना आश्वासन दिले. यात शेतकºयांनी शासनामार्फत आतापर्यंत कोणतेही सहकार्य न मिळाल्याची व्यथा मांडली. तसेच तलाठ्यांच्या विरोधात तक्रार केली.
तालुका कृषी अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फुटाणा या क्षेत्रात एकूण १३० हेक्टर शेतीपैकी फक्त १९ हेक्टर शेतात रोवणी झाली. बोरगाव/बाजार क्षेत्रात एकूण १२६ हेक्टर पैकी फक्त १२ हेक्टर शेतात रोवणी झाली. यावेळी शेतकºयांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी काळे यांनी घाबरण्याचे काही कारण नाही, शासन तुमच्या पाठीशी असल्याचे सांगीतले.
त्यानंतर शेतकरी व ग्रामीण जनतेसोबत त्यांनी एक सभा घेतली. या सभेत ज्या शेतकºयांनी पिक विमा केला अशा शेतकºयांना पिक विम्याचा लाभ अवश्य मिळेल. ज्यांनी पिक विमा केला नाही, त्यांनाही नुकसान भरपाई देण्यात येईल. त्याचप्रमाणे दुसºया हंगामाकरिता शासनातर्फे बियाणे देण्यात येईल. यावेळी तालुक्यातील इतर संबंधित अधिकाºयांना सूचना देत शेतकºयांना नियमित सेवा द्या अन्यथा कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी आ. संजय पुराम, पं.स.सभापती देवकी मरई, उपविभागीय अधिकारी लटारे, विस्तार अधिकारी पराते, नायब तहसीलदार बावनकर, जि.प. सदस्य मेमन व भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रमोद संगीडवार उपस्थित होते.