वेतन कपात निर्णयाविरोधात लढा उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 06:00 AM2019-11-25T06:00:00+5:302019-11-25T06:00:20+5:30

शिक्षक समितीच्यावतीने आयोजित जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत ते बोलत होते. सभेला राज्य सरचिटणीस विजय कोंबे, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र कोरगावकर, जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत, जिल्हा सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे, प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना शिंदे यांनी, शासनाच्या राज्य कर्मचारी समन्वयक समितीच्या माध्यमातून वाटाघाटी करुन शासनाच्या विनंतीला मान देवून ९ ऑगस्ट रोजी दुपारी संप मागे घेण्यात आला.

The fight against wage reduction decisions will set in motion | वेतन कपात निर्णयाविरोधात लढा उभारणार

वेतन कपात निर्णयाविरोधात लढा उभारणार

Next
ठळक मुद्देउदय शिंदे : गोंदिया जिल्हा शिक्षक समितीच्या सभेत घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना समन्वय समितीच्या आवाहनानुसार संपूर्ण महाराष्ट्रात विविध मागण्यांसाठी ७, ८ व ९ ऑगस्ट २०१८ रोजी राज्यव्यापी संप करण्यात आला होता. त्यामध्ये फक्त गोंदिया जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना वेतन कपात करण्यात आली. हे योग्य नाही, याकरिता राज्यस्तरावर गोंदिया जिल्ह्यातील तीन दिवसांच्या वेतन कपात निर्णय विरोधात शिक्षक समिती लढा देणार अशी घोषणा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी केली.
शिक्षक समितीच्यावतीने आयोजित जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत ते बोलत होते. सभेला राज्य सरचिटणीस विजय कोंबे, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र कोरगावकर, जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत, जिल्हा सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे, प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना शिंदे यांनी, शासनाच्या राज्य कर्मचारी समन्वयक समितीच्या माध्यमातून वाटाघाटी करुन शासनाच्या विनंतीला मान देवून ९ ऑगस्ट रोजी दुपारी संप मागे घेण्यात आला. त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन कपात केले जाणार नाही. परंतु महाराष्ट्रात गोंदिया जिल्हा परिषद कर्मचाºयांचे वेतन कपात करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले. हा लढा जिल्ह्यापुरता नसून महाराष्ट्र शासनाच्या विरोधात होता. म्हणून राज्यस्तरावर या कपाती संदर्भात लढा उभारणार असे सांगितले.
कोंबे यांनी, शिक्षकांच्या विविध समस्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करुन शिक्षक समितीच्या सभासद नोंदणी व जिल्हा अधिवेशनाची आखणी करण्यास सांगितले. कोरगावकर यांनी, संघटन मजबूत करण्यावर भर देण्यास सांगीतले. यासभेत दिक्षीत यांनी, जिल्हा समितीच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. संचालन खोब्रागडे यांनी केले.
आभार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बी.एस. केसाळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष किशोर डोंगरवार, विनोद बडोले, सुभाष मेमन, सुरेश कश्यप, सहसचिव संदीप तिडके, एन.बी. बिसेन, एस.सी. पारधी, संदीप मेश्राम, डी.एस. होटे, रोशन मस्करे, पी.एन. पटले, बी.बी. मेंढे, पी.पी. चव्हाण, विशाल कच्छवाहे, वाय.पी. लांजेवार, सोनुले, तिवारी, परमदास सर्याम, के.जे. बिसेन व इतर सभासद यांनी सहकार्य केले.

Web Title: The fight against wage reduction decisions will set in motion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.