चंद्रशेखर वॉर्डात दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:21 AM2021-07-10T04:21:16+5:302021-07-10T04:21:16+5:30

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चंद्रशेखर वाॅर्ड श्रीनगर येथील आरती प्रफुल्ल टेंभूर्णे (वय २९) यांना भेटण्यासाठी त्यांची आई ...

Fighting between two groups in Chandrasekhar ward | चंद्रशेखर वॉर्डात दोन गटांत हाणामारी

चंद्रशेखर वॉर्डात दोन गटांत हाणामारी

Next

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चंद्रशेखर वाॅर्ड श्रीनगर येथील आरती प्रफुल्ल टेंभूर्णे (वय २९) यांना भेटण्यासाठी त्यांची आई व बहीण ९ जुलैरोजी सकाळी ९ वाजता आल्या असता, टेंभूर्णे कुटुंबियांनी त्यांच्याशी वाद घातला. यात दोन गटांत हाणामारी झाली. परिणामी दोन गटांतील सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रमाकांत बोडके टेंभुर्णे (६५), प्रफुल टेंभुर्णे (४२) रवींद्र टेंभूर्णे (४७) यांनी तुम्ही वारंवार भेटायला काय देता, असे बोलून शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी माय-लेकींना मारहाण केली, तर दुसऱ्या गटातील आरोपी आरती प्रफुल्ल टेंभुर्णे (२९) रा. चंद्रशेखर वॉर्ड श्रीनगर, सत्यशीला रुस्तम नंदेश्वर (५५) रा. रावणवाडी व भारती कैलास साखरे (३५) रा. खमारी या तिघींनी रमाकांत टेंभुर्णे यांच्या कुटुंबियांना मारहाण केली. दोन्ही गटातील सहाजणांवर गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३२३,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

............

गोविंदपूर येथे जुन्या वादातून मारहाण

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गोविंदपूर येथील राहुल राधेश्याम हेमने (वय २३) यांना ८ जुलैरोजी सकाळी ७ वाजता जुन्या वादातून आरोपी अजय मोरे (४५) रा. संजयनगर गोंदिया याने शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यासंदर्भात गोंदेश्वर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३२३, ५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

........

सिव्हिल लाईन येथे तरुणाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

गोंदिया : शहरातील सिव्हिल लाईन येथील राणा हॉस्पिटलजवळील मुकेश राजेश तांबे (वय ३७) यांना घराच्या हिस्सा वाटणी व पैशाच्या वादातून आरोपी रितेश तांबे, अमित राजेश थांबे (२८) रा. सिव्हिल लाईन, गोंदिया व पूजा आशिष बैस (२५), रा. कामठी या तिघांनी ७ जुलैरोजी दुपारी ४ वाजता वाद करून मारहाण केली. पुढे ठार करण्याची धमकी दिली. या घटनेसंदर्भात ९ जुलैरोजी गोंदिया शहर पोलिसात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३२३, ५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Fighting between two groups in Chandrasekhar ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.