आरटीओ महिला अधिकाऱ्यास धमकाविणाऱ्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:20 AM2021-06-17T04:20:46+5:302021-06-17T04:20:46+5:30
प्राप्त माहितीनुसार मंगळवारी सीमा तपासणी नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या मोटार वाहन निरीक्षक शिवज्योती मच्छिंद्र भांबरे यांनी एका ओव्हरलोड असलेल्या वाहनावर ...
प्राप्त माहितीनुसार मंगळवारी सीमा तपासणी नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या मोटार वाहन निरीक्षक शिवज्योती मच्छिंद्र भांबरे यांनी एका ओव्हरलोड असलेल्या वाहनावर कारवाई केली. दरम्यान, त्या वाहनाला सोडण्याकरिता आरोपी नरेंद्र शर्मा रा. नागपूर यांनी महिला अधिकाऱ्यास धमकाविले व जीवे मारण्याची धमकी दिली. यावर सुद्धा महिला अधिकाऱ्यांनी शर्मा यांना समज देण्याचा प्रयत्न केला परंतु २ ते ३ तास तपासणी नाका सिरपूर येथे वाहनांना तपासणीसाठी थांबा न देता शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी महिला मोटार वाहन निरीक्षक यांनी देवरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. यावर देवरी पोलिसांनी आरोपी नरेंद्र शर्मा (५७), त्यांचा मुलगा (२७) व ड्रायव्हर अनंत वाणी (४०) तिन्ही राहणार नागपूर यांच्याविरुद्ध अपराध क्रमांक १४०/२०२१ अन्वये कलम ३५३, ५०४, ५०६, ३४ भादंविच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. देवरी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास देवरीचे ठाणेदार रेवचंद सिंगणजुडे करीत आहेत.