दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:34 AM2021-07-14T04:34:24+5:302021-07-14T04:34:24+5:30
............ महाराणा प्रताप वॉर्डातूून ३२ हजाराची दारू जप्त गोंदिया : शहराच्या सिव्हिल लाईन महाराणा प्रताप वॉर्डातील किरण कमलेश पडोळे ...
............
महाराणा प्रताप वॉर्डातूून ३२ हजाराची दारू जप्त
गोंदिया : शहराच्या सिव्हिल लाईन महाराणा प्रताप वॉर्डातील किरण कमलेश पडोळे (४१) याच्याकडून देशी-विदेशी अशी ३२ हजार ३०४ रूपये किमतीची दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस नायक संजय बावनकर यांनी केली आहे. गोंदिया शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
............
जुगार खेळणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
गोंदिया : शहराच्या चंद्रशेखर वॉर्डात जुगार खेळणाऱ्या दोघांवर गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विक्की संजू बाकरे (२६) रा. चंद्रशेखर वॉर्ड गोंदिया, मुनिश्वर तुलसीराम निरगुडे (३३) रा. चिखली ता. पवनी जि. भंडारा या दोघांवर गोंदिया शहर पोलीस ठाण्यात मुंबई जुगारबंदी कायदा कलम १२ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.