विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:27 AM2021-05-15T04:27:32+5:302021-05-15T04:27:32+5:30
गोंदिया : कोराेनाचा संसर्ग सुरू असल्याने विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नये, असे शासनाचे आदेश असतानाही या आदेशाला न जुमानता ...
गोंदिया : कोराेनाचा संसर्ग सुरू असल्याने विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नये, असे शासनाचे आदेश असतानाही या आदेशाला न जुमानता विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शक्ती चौकात विनाकारण रस्त्यावरुन फिरणाऱ्यांवर नाईक पोलीस शिपाई रऊफ पठाण यांनी कारवाई करताना त्यांच्याविरूध्द रामनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी कारवाई गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत आहे. शहराच्या जयस्तंभ चौकात १० आरोपी विनाकारण फिरताना आढळले. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे यांनी ही कारवाई केली. जयस्तंभ चौकात रात्री ८ वाजता विनाकारण सात लोक फिरत असताना त्यांच्यावर श्रीकांत मोरे यांनी कारवाई केली आहे. रावणवाडीच्या त्रिमूर्ती चौकात विनाकारण फिरत असलेल्यांवर पोलीस हवालदार वरखडे यांनी कारवाई केली आहे. कामठा येथील बसस्थानकावर सायंकाळी ६.३० वाजता विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस नाईक खुशालचंद चमरुजी बरवे यांनी कारवाई केली आहे. संबंधित पोलीस ठाण्यात आरोपींवर भादंविच्या कलम १८८, सहकलम ५१ ब राष्ट्रीय व्यवसथापन कायदा २००५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.