निमगाव प्रकल्पाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 10:16 PM2017-09-21T22:16:36+5:302017-09-21T22:16:53+5:30

तिरोडा तालुक्यातील निमगाव लघु सिंचन प्रकल्प वन विभागाच्या क्षेत्रात येत असल्याने गेल्या ४० वर्षांपासून रखडला होता. परिणामी परिसरातील ८१८ हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित होती.

 Fill the path of Nimgaon project | निमगाव प्रकल्पाचा मार्ग मोकळा

निमगाव प्रकल्पाचा मार्ग मोकळा

Next
ठळक मुद्देवन विभागाला देणार १४ कोटी : ४० वर्षांनंतर राज्य सरकारची मंजुरी

डी.आर.गिरीपुंजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : तिरोडा तालुक्यातील निमगाव लघु सिंचन प्रकल्प वन विभागाच्या क्षेत्रात येत असल्याने गेल्या ४० वर्षांपासून रखडला होता. परिणामी परिसरातील ८१८ हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित होती. मात्र बुधवारी (दि.२०) रोजी राज्य सरकारने या प्रकल्पातील अडचण दूर केल्याने निमगाव लघु सिंचन प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.
तिरोडा तालुक्यातील नक्षलग्रस्त भागातील सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी निमगाव लघु प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात वनविभागाच्या मोठ्या प्रमाणावर जमिन जात होती. प्रकल्पात जाणाºया जमीनीचा मोबदला वनविभागाला दिल्याशिवाय हा प्रकल्प मार्गी लागणे शक्य नव्हते. वनक्षेत्राच्या भरपाईपोटी १४ कोटी २६ लाख ८६ हजार रुपये देण्यास मागील ४० वर्षांपासून चालढकल केली जात होती. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यात अडथळा निर्माण झाला होता.
वन विभागाला देय असलेली रक्कम शासनाने मंजूर करावी आणि या प्रकल्पाच्या मार्गातील अडथळा दूर करावा. यासाठी आ.विजय रहांगडाले यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला.त्याचीच दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी प्रदान केली. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला असून तब्बल ८१८ हेक्टर जमीनीला सिंचनाची सोय होणार आहे. हा प्रकल्प विदर्भातील नक्षलग्रस्त भागातील सिंचनाचा विकास करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. तिरोडा तालुक्यातील असून याच्या बुडीत क्षेत्रात वनविभागाच जमीन जात आहे. त्याच्या नुकसान भरपाईपोटी उर्वरीत १४ कोटी २६ लाख ८६ हजारांचा निधी वनविभागास देण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली.
या प्रकल्पातील प्रस्तावित गावे आर्थिकदृष्ट्या मागासली असून यामध्ये आदिवासी जाती जमाती, भूमिहिन व दारिद्रय रेषेखालील कुटूंबाचा समावेश आहे. या भागाच्या विकासासाठी हा प्रकल्प गरजेचे आहे.
प्रकल्प झाला १ हजार कोटीचा
प्रकल्पाला महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभागाने ९ जुलै १९७३ नुसार मंजुरी दिली होती. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत २३ कोटी ७० लाख रुपये होती. त्यावेळी कामाला सुरुवात होऊन ९० टक्के मातीकाम व पाळीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाअंतर्गत काही प्रमाणात वनभूमी बुडीत क्षेत्रात येते होते. त्यामुळे मागील ४० वर्षापासून हा प्रकल्प रखडला. परिणामी प्रकल्पाच्या किंमतीत पाच ते दहा पट वाढ झाली असून २३ कोटीच्या प्रकल्पाची किंमत आता १ हजार कोटींवर पोहचली आहे.
पाठपुराव्याला यश
धापेवाडा सिंचन प्रकल्पाचे पाणी खळबंदा जलाशयात पडले तसेच चोरखमारा, बोदलकसा जलाशयात पाडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न व निधी मंजूर केला. निमगाव (आबेनाला) लघु प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा व निधी मंजूर करण्यासाठी शासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला.

Web Title:  Fill the path of Nimgaon project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.