नवीन फायर स्टेशनचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 12:02 AM2018-08-09T00:02:31+5:302018-08-09T00:04:15+5:30

शहरातील अग्निशमन व्यवस्था बळकट करण्यासाठी अतिरीक्त फायर स्टेशन मंजूर करण्यात यावे. अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेत केली. शिवाय अग्निशमन विभागातील रिक्त पदे भरुन त्यात किमान २० टक्के पद अनुकंपाधारकांची भरण्यात यावी, अशी मागणीही आमदार अग्रवाल यांनी केली होती. त्याला शासनाने हिरवी झेंडी दिली आहे.

Fill the route of the new fire station | नवीन फायर स्टेशनचा मार्ग मोकळा

नवीन फायर स्टेशनचा मार्ग मोकळा

Next
ठळक मुद्दे२५ टक्के अनुकंपाधारकांचा समावेश : रिंग रोडवर जागेला मिळाली मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील अग्निशमन व्यवस्था बळकट करण्यासाठी अतिरीक्त फायर स्टेशन मंजूर करण्यात यावे. अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेत केली. शिवाय अग्निशमन विभागातील रिक्त पदे भरुन त्यात किमान २० टक्के पद अनुकंपाधारकांची भरण्यात यावी, अशी मागणीही आमदार अग्रवाल यांनी केली होती. त्याला शासनाने हिरवी झेंडी दिली आहे.
आमदार अग्रवाल यांनी, विधानसभेत गोंदिया तालुका आता जिल्हा बनला असून शहरातील लोकसंख्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र त्या दृष्टीने अग्निशमन व्यवस्था बळकट करण्यासाठी पायाभूत सुविधांचा अभाव होता. डिसेंबर २०१६ मध्ये घडलेल्या घटनेत सात जणांना जीव गमवावा लागला. तर काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत बाजारातील १५-१६ दुकाने जळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अशात मात्र अग्शिमन व्यवस्था आगीवर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली. अग्निशमन विभागात कित्येक पदे रिक्त आहेत. जे कर्मचारी आहेत ते अप्रशिक्षीत आहेत. वाहनांवर आधुनिक अग्निशमन यंत्राची कमतरता आहे. त्यात शहरातील रेलटोली-रामनगर भागात अतिरीक्त फायर स्टेशन बनवायचे असून नगर विकास विभागाकडे नगर परिषद जागेच्या मंजुरीचे आदेश अप्राप्त आहेत. एकीकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असताना नगर परिषद अनुकंपाधारक मोठ्या संख्येत असून नोकरीची वाट बघत त्यांची वयोमर्यादा बाद होत आहे.
अशात नवीन फायर स्टेशनला मंजुरी देण्यात यावी. त्यात किमान २० टक्के अनुकंपाधारकांना घेण्यात यावे, अशी मागणी आमदार अग्रवाल यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
आमदार अग्रवाल यांनी केलेल्या सर्वच मागण्यांना मान्य करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन फायर स्टेशनसाठी नगर परिषदेच्या जागेला मंजुरी देण्याची घोषणा केली. सोबतच अग्निशमन विभागात भर्ती मध्ये किमान २५ टक्के अनुकंपाधारकांना घेण्याचे आदेशही त्यांनी दिले. विशेष म्हणजे, नगर परिषद जागेवर नवीन अग्निशमन केंद्र बनविण्यासाठी नगर विकास विभागाचे अपेक्षीत आदेशही नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांना मिळाले आहे.

Web Title: Fill the route of the new fire station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.