युवकांच्या श्रमदानाने सौंदर्यीकरणात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 10:27 PM2017-10-24T22:27:35+5:302017-10-24T22:27:46+5:30

गाव स्वच्छ व सुंदर असावे हे मुलमंत्र आत्मसात करुन येथील नागरिकांनी नगर पंचायत उपाध्यक्ष आशिष बारेवार यांच्या पुढाकाराने स्थानिक पवन तलावाचे सौंदर्यीकरण केले.

Filled with beautification of the youth, beautification of youth | युवकांच्या श्रमदानाने सौंदर्यीकरणात भर

युवकांच्या श्रमदानाने सौंदर्यीकरणात भर

Next
ठळक मुद्देपर्यटनस्थळाचा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न : गोरेगावच्या युवकांचा आदर्श

दिलीप चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : गाव स्वच्छ व सुंदर असावे हे मुलमंत्र आत्मसात करुन येथील नागरिकांनी नगर पंचायत उपाध्यक्ष आशिष बारेवार यांच्या पुढाकाराने स्थानिक पवन तलावाचे सौंदर्यीकरण केले. दर रविवारी येथील नागरिक पवन तलाव येथे श्रमदान करतात. त्यामुळे दिवसेंदिवस या तलावाच्या सौंदर्यीकरणात भर पडत आहे.
प्राप्त माहितीनुसार २ आॅक्टोबर पासून पवन तलाव येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. एक महिन्याच्या कमी कालावधीत येथील नागरिकांना तलावाचा चेहरामोहराच बदलून टाकला. दर रविवारी आशीष बारेवार यांच्या संकल्पनेतून इथे स्वच्छता अभियान राबविण्यात येते. गावकरी हातात झाडू घेवून येथे साफसफाई करतात. त्यामुळे येथील पाण्याच्या शुध्दीकरणातही भर पडली आहे.
गोरेगावात पवन तलाव हे मध्यभागी वसलेले आहे. बºयाच वर्षापासून या तलावाचे खोलीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे तलाव समतल झाले असून पाणी साठवण क्षमताही कमी झाली आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात तलावात पाणी राहत नाही. तलावाची साफसफाई होत नसल्यामुळे येथील पाणी प्रदूषित झाले होते.
या सर्व बाबीला आशिष यांनी हेरले व त्यांच्या कल्पनेतून पवन तलावाला जीवदान देण्यासाठी युवा शक्ती स्पोर्ट, विश्व गायत्री परिवार व गोरेगाव नगर पंचायत प्रशासनाने हातात झाडू घेत पवन तलावाला नंदनवन बनविण्याचा संकल्प केला. यासाठी नमन जैन, साकुरे गुरुजी, प्रणय वैद्य, विकास बारेवार, हिमांशु बारेवार, प्रविण बारेवार, यश कुंडजवार, दीपक रहांगडाले, अमोल भेंडारकर, संजय घासले व गावकरी यांनी पवन तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचे काम सुरू केले. दर रविवारी येथे नागरिक स्वच्छतेसाठी पोहचू लागले. स्वच्छता अभियान राबवू लागले. तलावाचे पाणी साठवण क्षमता वाढावी, पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त व्हावा, म्हणून इथे वृक्षारोपण करण्यात आले. झाडांना सुरक्षा देण्यासाठी जुन्या टायरचा वापर करण्यात आला. त्या टायरला रंगाने रंगविण्यात आले. टायरच्या मध्यभागी खड्डा खोदून झाडाचे रोपवन करण्यात आले. तर टायरचे कठडे तयार करुन जनावरांपासून त्या झाडाचे संरक्षण करण्यात आले.
पवन तलावात विद्युत व नागरिकांना बसण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी येथे नागरिक येतात. या तलावाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळेल अशी आशा गावकºयांना आहे. त्यासाठी इंजि. बारेवार परिश्रम घेत आहेत.

Web Title: Filled with beautification of the youth, beautification of youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.