३८.४५ कोटींच्या पुनर्वसन पॅकेजला अंतिम मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2017 02:04 AM2017-07-06T02:04:56+5:302017-07-06T02:04:56+5:30
बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे नशीब अखेर फळफळले असून त्यांच्या पुनर्वसनासाठी ३८.४५ कोटींच्या पॅकेजला
बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी खूशखबर : उपविभागीय अधिकाऱ्यांना मिळाले आदेशलोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे नशीब अखेर फळफळले असून त्यांच्या पुनर्वसनासाठी ३८.४५ कोटींच्या पॅकेजला केंद्र शासनाने अंतीम मंजूरी दिली आहे. भारतीय विमानपत्तन प्राधीकरणचे बिरसी विमान क्षेत्राचे विमान पतन निदेशक संदीप पिंपळापुरे यांनी याबाबत अधिकारीक आदेश काढले आहेत.
बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन पॅकेजसाठी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधान भवन स्थित कार्यालयात भारतीय विमानपत्तन प्राधीकरण चे विभागीय कार्यकारी संचालक के.एल.शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधीत अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली होती. येथे आमदार अग्रवाल यांनी, शर्मा यांना बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन पॅकेजला केंद्र शासनाच्या मंजूरीसाठी वैयक्तीकरित्या विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश दिले होते. तसेच विमानतळामुळे बाधीत कामठा-परसवाडा रस्त्याचे अधिग्रहण होण्याची स्थितीत पर्यायी रस्ता निर्माण करून तोपर्यंत वर्तमान रस्ता खुला ठेवणे व त्याची दुरूस्ती करण्याचे निर्देश दिले होते.
आमदार अग्रवाल यांच्या निर्देशावरून भारतीय विमानपत्तन प्राधीकरणच्या अधिकाऱ्यांकडून प्रलंबीत पॅकेजसाठी दिल्लीत प्रयत्न घेण्यात आले. तर आमदार अग्रवाल यांनी केंद्रीय नागरी विमानन मंत्री अशोक अशोक गजपती राजू यांनाही पॅकेजच्या मंजूरीसाठी निर्देश देण्याची मागणी केली होती. परिणामी नागरी विमानन मंत्रालयाच्या समितीने राज्य शासनाकडून प्रस्तावीत ३८.४३ कोटींच्या पुनर्वसन पॅकेजला मंजूर दिली होती. तर विमानपत्तन प्राधीकरणचे विभागीय कार्यकारी संचालक शर्मा यांच्या निर्देशावरून कामठा-परसवाडा रस्ता दुरूस्तीचे कार्य सुरू करण्यात आले.
दरम्यान बिरसी विमान क्षेत्राचे विमानपत्तन निदेशक पिपंळापुरे यांनी निदेशक मंडळाच्या बैठकीतील निर्णय बघत राज्य शासनाकडून प्रस्तावीत ३८.४५ कोटींच्या प्रस्तावाला मंजूरीचे अधिकारीक पत्र काढून कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले आहे.