परीक्षेची नोंदणी अंतिम टप्यात
By admin | Published: August 2, 2015 02:02 AM2015-08-02T02:02:39+5:302015-08-02T02:02:39+5:30
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवक-युवती विविध शासकीय, निमशासकीय सेवेत जाण्यासोबतच प्रशासकीय अधिकारी व्हावे
गोंदिया : स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवक-युवती विविध शासकीय, निमशासकीय सेवेत जाण्यासोबतच प्रशासकीय अधिकारी व्हावे या दृष्टीने स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, स्टडी सर्कल, युवा नेक्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गोंदिया जिल्ह्यातून सुद्धा घडेल प्रशासकीय अधिकारी’ या जिल्हास्तरीय या उपक्रमात जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा -२०१५ चे आयोजन ९ आॅगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता मनोहरभाई पटेल म्युनिसिपल ज्युनियर कॉलेज, इंदिरा गांधी स्टेडियम जवळ, गोंदिया येथे करण्यात आले आहे.
सदर परीक्षेत प्रथम क्रमांक घेणाऱ्या विद्यार्थ्याला ५००१ व स्टडी सर्कलच्या एमपीएससी फाऊंडेशनचे ८ महिने कालावधीचे नि:शुल्क मार्गदर्शन, द्वितीय पुरस्कार ३००१ व स्टडी सर्कलच्या एमपीएससी फाऊंडेशन कोर्समध्ये ८० टक्के सूट, तृतीय पुरस्कार २००१ व स्टडी सर्कलच्या एमपीएससी फाऊंडेशन कोर्समध्ये ७० टक्के, चौथा पुरस्कार स्टडी सर्कलच्या एमपीएससी फाऊंडेशन कोर्सच्या फी शुल्कामध्ये ६० टक्के आणि पाचवा क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्याला स्टडी सर्कलच्या एमपीएससी फाऊंडेशन कोर्सच्या फी शुल्कामध्ये ५० टक्के सूट मिळणार आहे. जिल्ह्यात जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयार करण्याकडे वळावे व त्यांच्यामधून प्रशासकीय अधिकारी तयार व्हावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीचे पत्र कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पाठविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी या पत्रातून केले आहे. किमान दहावी पास असलेले विद्यार्थी परीक्षेत बसण्यात पात्र स्पर्धकांना १५ आॅगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व गौरव चिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञान परीक्षेसाठी आपली नावे नोंदणी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क स्टडी सर्कल, श्याम मांडवेकर ७७४५०३०३०२, जिल्हा माहिती कार्यालय, सिव्हील लाईन ०७१८२-२३७७६०, लोकमत युवा नेक्स्ट ९८८१०११८२१ या लोकमत जिल्हा कार्यालय, गोरेलाल चौक, गोंदिया या ठिकाणी क्रमांकावर संपर्क साधावा. (तालुका प्रतिनिधी)