सखी मंचची अंताक्षरी स्पर्धा २९ रोजी
By admin | Published: July 24, 2014 11:56 PM2014-07-24T23:56:28+5:302014-07-24T23:56:28+5:30
लोकमत सखी मंचद्वारे विदर्भ साहित्य संघ शाखा गोंदियाच्या सहकार्याने स्थानिक भवभूती रंगमंदिर रेलटोली येथे २९ जुलै रोजी अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन चरणात पार पडणार आहे.
गोंदिया : लोकमत सखी मंचद्वारे विदर्भ साहित्य संघ शाखा गोंदियाच्या सहकार्याने स्थानिक भवभूती रंगमंदिर रेलटोली येथे २९ जुलै रोजी अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन चरणात पार पडणार आहे.
या स्पर्धेचे प्रथम चरण आॅडिशनचे राहील. आॅडिशन २६ जुलै रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजतापर्यंत सुभाष उद्यान परिसरात आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धेत स्पर्धकांना दोन-दोनच्या जोड्या बनवून भाग घ्यावे लागेल. भाग घेणाऱ्या स्पर्धकांना तीन फेऱ्यांत आपल्या कलेचे प्रदर्शन करावे लागेल.
पहिल्या फेरीत स्पर्धकाला दिलेला चित्रपटाच्या गाण्याचा कडवा व ओळ ओळखून गावे लागेल. दूसऱ्या फेरीत गाणा ऐकल्यानंतर चित्रपट किंवा त्यातील कलावंतांचे नाव सांगावे लागेल.
तिसऱ्या फेरीत बॉक्समध्ये ठेवलेली एक चिठ्ठी उचलावी लागेल व चिठ्ठीत असलेल्या चित्रपटाचे नावास मूक अभिनयाच्या (दम शराज) माध्यमातून प्रदर्शित करावे लागेल. तिसऱ्या फेरीत जोडीमधून एक स्पर्धक मूक अभिनय करेल व दूसऱ्याला चित्रपटाचे नाव सांगावे लागेल.
आॅडिशनच्या दरम्यान अंतिम फेरीसाठी चार जोड्यांची निवड करण्यात येईल.
अंतिम स्पर्धा भवभूती रंगमंदिरात २९ जुलै दुपारी तीन वाजता होईल. यात विजेत्यांना आकर्षक पुरस्कार दिले जातील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी सखी मंचच्या सदस्यांच्या जोडीसाठी ५० रूपये व इतर महिलांसाठी ७० रूपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे.
सखी मंचच्या सदस्यांसह इतर महिलांनीही या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सखी मंचची जिल्हा संयोजिका दीपा भौमिक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी (९४२३६८९६६४) यावर संपर्क साधावा.
स्पर्धकांनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेळेत संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (प्रतिनिधी)