अखेर तेंदुपत्ता बोनस मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 09:05 PM2019-03-03T21:05:46+5:302019-03-03T21:06:41+5:30
४२ गावातील तेंदूपत्ता कामगारांचे बोनस अद्याप मिळाले नव्हते. लाभधारकांनी वनविभागाविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने वाचा फोडली. अखेर तेंदूपत्ता संकलन केंद्रावरील लाभधारकांच्या बोनसचे आदेश निघाले असून वाटप प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : ४२ गावातील तेंदूपत्ता कामगारांचे बोनस अद्याप मिळाले नव्हते. लाभधारकांनी वनविभागाविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने वाचा फोडली. अखेर तेंदूपत्ता संकलन केंद्रावरील लाभधारकांच्या बोनसचे आदेश निघाले असून वाटप प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
अर्जुनी-मोरगाव वनक्षेत्र कार्यालयांतर्गत ४२ गावातील ३५७३ तेंदूपत्ता लाभधारकांचे गत दोन वर्षापासून २ कोटी ६ लाख रुपये थकीत होते. बोनसच्या प्रतिक्षेत प्रदीर्घ कालावधी निघून गेल्यानंतर लाभधारकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर ‘लोकमत’ने २४ फेब्रुवारी रोजी ‘तेंदूपत्ता मजूर तीन वर्षापासून बोनसच्या प्रतिक्षेत’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची वनविभागाने दखल घेत बोनसची रक्कम मंजूर केली. वडेगाव, खामखुर्रा येथील लाभधारकांना बोनसचे वितरण करण्यात आले. उर्वरित गावातील लाभधारकांचे धनादेश काढण्यात आले असून त्याची वितरण प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले यांनी दिली.
खामखुर्रा येथील धनादेश वितरणप्रसंगी वनपाल प्रविण केळवतकर, निप्पल बरय्या, अरविंद खुणे, क्रिष्णा पारधी, अशोक ठाकरे, मनोहर सोनवाने, भूकेश गजापुरे, टेकचंद जांभुळकर, कनिराम नंदेश्वर, ज्ञानेश्वर मिसार, जनार्धन कोड्डे, बळीराम दूनेदार, शामराव ठाकरे, प्रशांत जांभुळकर, परसराम जांभुळकर, महादेव जांभुळकर, प्रफुल बडोले व गावकरी उपस्थित होते.