अखेर बिबट्या अडकला पिंजऱ्यात; गोंदिया जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 03:59 PM2020-06-22T15:59:40+5:302020-06-22T16:00:09+5:30

सोनेगाव - तिडका मार्गावर बिबट जखमी असल्याची बातमी वनविभागाला सोमवारी सकाळी कळली. या बिबट्याला पकडण्यासाठी गोंदिया वनविभागाच्या शीघ्र कृती दलाने तब्बल दोन तास परिश्रम घेतले.

Finally the leopard got stuck in the cage; Incidents in Gondia district | अखेर बिबट्या अडकला पिंजऱ्यात; गोंदिया जिल्ह्यातील घटना

अखेर बिबट्या अडकला पिंजऱ्यात; गोंदिया जिल्ह्यातील घटना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: बोडगावदेवी वनक्षेत्रांतर्गत सोनेगाव -तिडका मार्गावरील बोदरा कक्ष क्र २७९ मध्ये सोमवारी सकाळी १२ वाजता जखमी बिबटला जेरबंद करण्यात आले. सध्या त्याला नवेगावबांध येथे नेण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर त्याला गोरेवाडा ( नागपूर )येथे नेले जाणार असल्याचे समजते. या बिबट्याला पकडण्यासाठी गोंदिया वनविभागाच्या शीघ्र कृती दलाने तब्बल दोन तास परिश्रम घेतले. तो नेमका कशामुळे जखमी झाला ते वैद्यकीय परिक्षणानंतर कळेल.
सोनेगाव - तिडका मार्गावर बिबट जखमी असल्याची बातमी वनविभागाला सोमवारी सकाळी कळली. लगेच वनपरिक्षेत्र अधिकारी बी टी दुर्गे आपल्या सहकाऱ्यांसह बोदरा जंगलात गेले. रस्त्याच्या कडेला असलेल्या टी सी एम नालीत बिबट बसलेला दिसून आला. त्याची हालचाल होत नसल्याने तो जखमी झाला असावा असा तर्क काढण्यात आला. काही वेळातच त्याने समोरच्या पायांचा आधार घेत सरपटत नालीचा उंचवटा ओलांडला. त्याच्या या हालचालीवरून तो पायाने चालू शकत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शीघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले. शीघ्र कृती दल घटनास्थळी दाखल झाले. त्याला पिंजऱ्यात अडकविण्यावर शिक्कामोर्तब केले. लगेच नवेगावबांध येथून पिंजरा बोलावण्यात आला व त्या बिबटला अलगद पिंजऱ्यात कैद करण्यात शीघ्र कृती दलाला यश आले. या बिबटचे वय सुमारे अडीच ते तीन वर्षे असल्याचे समजते. तो बिबट वाहनाच्या धडकेत, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात की आजारपणामुळे जखमी झाला ते अद्याप स्पष्ट झाले नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर त्याचा उलगडा होणार आहे. बिबट बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. त्यावर नियंत्रण राखण्यात स्थानिक पोलिसांनी चोख भूमिका बजावली.

ही मोहीम यशस्वी करण्यात वनपरिक्षेत्र अधिकारी बी टी दुर्गे, क्षेत्र सहाय्यक उमेश गोटेफोडे, वेलतुरे, शीघ्र कृती दलाचे क्षेत्र सहाय्यक राजेंद्रसिंग बहुरे, मिथुन चव्हाण, चंद्रकांत गोडे, प्रवीण केळवतकर, दीपक बरडे, मुकेश सोनवाने, धार्मिक तसेच वन कर्मचा?्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Finally the leopard got stuck in the cage; Incidents in Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.