अखेर उघडले रेल्वे स्टेशनचे उत्तर बाजूचे प्रवेशद्वार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:26 AM2021-03-07T04:26:25+5:302021-03-07T04:26:25+5:30
गोंदिया : शहरातील रेल्वे स्थानकातील केवळ एक मुख्य प्रवेशद्वार सुरु झाले होते आणि उत्तर दिशेकडे जाणाऱ्या इतर दोन प्रवेशद्वार ...
गोंदिया : शहरातील रेल्वे स्थानकातील केवळ एक मुख्य प्रवेशद्वार सुरु झाले होते आणि उत्तर दिशेकडे जाणाऱ्या इतर दोन प्रवेशद्वार बंद असल्यामुळे प्रवाशांना आणि सामान्य जनतेला अडचणीला तोंड द्यावे लागत होते. काँग्रेस कमिटीचे सचिव अमर वराडे यांनी गोंदिया रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर यांना ४ फेब्रुवारी रोजीचे दुसरे पत्र दिले होते. त्यानंतर शनिवारी या रेल्वे स्थानकावरील उत्तर बाजुचे प्रवेशव्दार प्रवाशांसाठी उघडून देण्यात आले.
गोंदिया रेल्वे स्थानकावरील उत्तरकडेली प्रवेशव्दाराच्या समस्येबाबत २४ फेब्रुवारी रोजी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा घेराव घालण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कोरोनाच्या नियमांना विचारात घेवून हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यांनतर ३ मार्च रोजी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अमर वराडे यांच्या पुढाकाराने उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगापाते यांनी कार्यालयात बैठक आयोजित केली. त्यामध्ये जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासनाने रेलटोली येथे असलेले एक गेट उघडण्याचा निर्णय घेतला. ६ मार्च रोजी गोंदिया रेल्वे स्थानकाच्या उत्तरेस रेलटोलीचे प्रवेशद्वार उघडण्यात आले. यामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिक, छोटे व्यापारी, ऑटो रिक्षा चालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नागरिकांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अमर वराडे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव विनोद जैन, गोंदया तालुकाध्यक्ष सूर्यप्रकाश भगत, गोंदिया शहर अध्यक्ष जहीर अहमद, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आलोक मोहंत, जिल्हा सरचिटणीस योगेश अग्रवाल,माजी अध्यक्ष चमन बिसेन, ओबीसी विभाग तालुकाध्यक्ष सुशील खरकाटे, जिल्हा किसान काँग्रेसचे समन्वयक नीलम हलमारे, जिल्हा सरचिटणीस बाबा मिश्रा यांचे आभार मानले.