अखेर गोदामाला सील ठोकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 09:26 PM2018-12-24T21:26:44+5:302018-12-24T21:26:58+5:30
आधारभूत हमी भाव धान खरेदी योजनेंतर्गत येथील आदिवासी विविध सेवा संघ केंद्रावरील गोदामाला नवेगावबांधच्या उपप्रादेशिक व्यवस्थापकांनी सील ठोकले. ही कारवाई सोमवारी (दि.२४) सायंकाळी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : आधारभूत हमी भाव धान खरेदी योजनेंतर्गत येथील आदिवासी विविध सेवा संघ केंद्रावरील गोदामाला नवेगावबांधच्या उपप्रादेशिक व्यवस्थापकांनी सील ठोकले. ही कारवाई सोमवारी (दि.२४) सायंकाळी करण्यात आली.
येथे आदिवासी विकास महामंडळाने सेवा सह संस्थेला धान खरेदी केंद्र दिले. या केंद्रावर शेतकरी धान विक्रीला आणतात. डिसेंबर रोजी केंद्रावर धान मोजणी सुरु असताना शेतकऱ्याला शंका आली. त्या शेतकºयाने दुबार मोजणी केली असता प्रत्येक पोत्यात ४५ ते ४६ किलो धान होते. त्यादिवशी धान विक्री केलेल्या प्रत्येक शेतकºयांच्या ५-५- पोत्यांची मोजणी केली असता त्यात अधिकचेच धान आढळून आले.
शेतकºयांनी लागलीच नवेगावबांध येथील उपप्रादेशिक व्यवस्थापक राहूल पाटील यांना तक्रार केली असता त्यांनी लगेच येथील केंद्र गाठले. त्यांनी पडताळणीसाठी काही पोत्यांचे वजन करण्यास सांगितले असता वजन ४५ ते ४६ किलो भरले. परत शेतकºयांनी गोदामातील खरेदी झालेल्या धानाचे वजन करण्याचा आग्रह केला. त्यात सुद्धा अनियमितता आढळून आली. यावरुन या केंद्रावर सुरुवातीपासूनच खरेदी झालेल्या धानात सह.संस्थेच्या संचालक मंडळाशी संगनमत करुन शेतकºयांची लूट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यासंदर्भात दै. लोकमतने हे प्रकरण चव्हाट्यावर आणले होते. याची चौकशी करुन शेवटी या केंद्राच्या गोदामाला सोमवारी (दि.२४) सील ठोकण्यात आले. यावेळी भंडाराचे प्रादेशिक व्यवस्थापक एस.एस. अंबडकर, नवेगावबांधचे उपप्रादेशिक व्यवस्थापक राहूल पाटील व आदिवासी सेवा सह. संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते.
आज आम्ही संस्थेत जावून कारवाई केली. काही नागरिकांचे बयान घेतले व धान खरेदी गोदामाला सील लावले असून पुढची कारवाई सुरू आहे. चार दिवसांपासून येथे खरेदी बंद आहे. वरिष्ठांकडून आदेश आल्यावर धान खरेदी सुरू करण्याचे निर्देश देता येईल.
- राहूल पाटील
उपप्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, नवेगावबांध.