हॉट मिक्स डांबर प्लांटवर अखेर जप्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 09:54 PM2019-05-21T21:54:19+5:302019-05-21T21:54:44+5:30

लोकमतच्या पाठपुराव्यानंतर तहसीलदार विनोद मेश्राम यांनी सोमवारी (दि.२०) सायंकाळी ६ वाजता गंगेझरी येथील हॉट मिक्स डांबर प्लांटला भेट देऊन ज्प्तीची कारवाई केली. या कारवाईचे सर्वच स्तरावरुन कौतूक केले जात आहे. या धडक कारवाईमुळे अवैध काम करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

Finally, the seizure action on the Hot Mix Daumbar Plant | हॉट मिक्स डांबर प्लांटवर अखेर जप्तीची कारवाई

हॉट मिक्स डांबर प्लांटवर अखेर जप्तीची कारवाई

Next
ठळक मुद्देलोकमतच्या पाठपुराव्याला यश : तहसीलदारांनी केली जप्तीची कारवाई, ग्रामपंचायतही आली अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : लोकमतच्या पाठपुराव्यानंतर तहसीलदार विनोद मेश्राम यांनी सोमवारी (दि.२०) सायंकाळी ६ वाजता गंगेझरी येथील हॉट मिक्स डांबर प्लांटला भेट देऊन ज्प्तीची कारवाई केली. या कारवाईचे सर्वच स्तरावरुन कौतूक केले जात आहे. या धडक कारवाईमुळे अवैध काम करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.
सोमलपूर गट ग्रामपंचायत अंतर्गत मौजा गंगेझरी येथील शासकीय भूमापन क्रं.१६ मधील १.१० हे.आर.जागेपैकी ०.६० जागेवर हे डांबर प्लांट परवानगी न घेता थाटण्यात आले होते. निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या सिरेगावबांध तलावाच्या अगदी शेजारी या प्लांटची निर्मिती करण्यात आली होती. यामुळे जैवविविधता, विदेशी पक्ष्यांच्या मुक्त संचारात बाधा, वन्यजीवरांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला होता. या प्लांटमुळे ध्वनी व वायू प्रदुषण होऊन पर्यावरण धोक्यात आले होते.
यासंदर्भात लोकमतने ९ मे च्या अंकात डांबर प्लांटमुळे पर्यावरणाला धोका या मळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. हे वृत्त प्रकाशित होताच प्रशासन खळाडून जागे झाले होते व विविध विभागामार्फत चौकशी सुरू करण्यात आली होती. लोकमतने यासंदर्भात आणखी सखोल चौकशी केली असता हा प्लांट ग्रामपंचायत सोमलपूरचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच महाराष्टÑ राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रमाणपत्राच्या आधारावर अंकीत फत्तेसिंह चव्हाण यांनी सुरु केले होते. ही जागा शासन मालकीची असतांनाही ग्रामपंचायतने २५ हजार रुपये प्रतीवर्ष प्रमाणे भाडे तत्वावर एका करारनाम्याद्वारे दिली होते. हे वास्तव लोकमतने २० मे रोजी वृत्त प्रकाशित उघडकीस आणले होते. लोकमतच्या सततच्या पाठपुराव्यानंतर महसूल प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेतला. आधी नायब तहसीलदार एम.यु.गेडाम यांनी याप्रकरणाची चौकशी केली होती तर पंचायत समितीतर्फे विस्तार अधिकारी (पंचायत) राजू वलथरे यांनी चौकशी केली. सोमवारी (दि.२०) तहसीलदार विनोद मेश्राम यांनी मौका स्थळी भेट दिली व सर्व साहित्याच्या जप्तीची कारवाई केली. ही जप्ती फत्तूसिंह राणप्रताप चव्हाण गोंदिया यांच्याकडून करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्यात १३ चक्का ट्रक क्रमांक एमएच ३१-सीक्यू ६०२९, १० चक्का टिप्पर क्रमांक एमएच ४०-वाय ९५३३, जेसीबी क्रमांक एमएच ३५ जी ५२११, एक मोठा जनरेटर, एक मोठी अ‍ॅपल कंपनीची हॉट मिक्स मशीन, एक मोठा अंदाजे १४४ चौ. फुट टिनाचा शेड, १४० नग रिकामे डांबर ड्रम, २३ नग भरलेले डांबरी ड्रम, अंदाजे १४ बिट्ट्या जळाऊ लाकूड, एक आॅपरेटर मशिन कंट्रोल रुम कॅबीन, एक इलेक्ट्रीक मोटरसह असलेला हातपंप, २७ आंबा, ६ पळस, ९ सागवान, १ जांभुळ व ३७ आंजन झाडे जप्त करण्यात आली.
जप्त केलेले सर्व साहित्य फत्तूसिंह राणाप्रताप चव्हाण यांना जिथे गरज भासेल तिथे हजर करण्याच्या अटीवर सुपूर्त करण्यात आले आहे. मंगळवारी तहसीलदार मेश्राम यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना पत्र देऊन प्लांट परिसरात असलेल्या फळझाडांचे व जमिनीच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. विशेष म्हणजे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई होय.
नियमानुसार कारवाई होणार
परवानगी न घेता डांबर प्लांटची उभारणी करणाºयावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. प्लांट मालकावर जागेच्या केलेल्या नुकसानीदाखल दंड आकारणी केली जाईल. या जागेवर उभे असलेले डांबर प्लांट काढून घेण्याच्या संबंधाने वरिष्ठांची परवानगी घेऊन ती प्रक्रिया पार पाडली जाईल. अशी माहिती तहसीलदार विनोद मेश्राम यांनी लोकमतशी बोलताना दिली.
ग्रामपंचायत संकटात
याप्रकरणात वर्तमानपत्रातून होणाºया सततच्या भडीमारामुळे सोमलपूर ग्रामपंचायतने १७ मे रोजी प्लांट मालक अंकीत चव्हाण यांना पत्र देऊन बंद करावा असे आदेश दिले. मात्र प्लांट मालकाने पलटवार करुन आपण पाच वर्षासाठी करार केला आहे. त्यामुळे होणाºया नुकसानीची भरपाई द्यावी असे प्रत्युतर दिल्याने ग्रामपंचायत संकटात सापडली आहे. शासनाची जागा ग्रा.पं.ने करारनाम्याद्वारे कशी भाड्याने दिली याचा अहवाल तयार करुन जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पाठविण्याचे आदेश पाठविण्यात आल्याची माहिती आहे.यावरुन सोमलपूर ग्रा.पं.चे सरपंच, ग्रामसेवक व ग्रा.पं.सदस्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. याप्रकरणात पुढे काय होणार याची उत्सुकता सिगेला पोहचली आहे.

Web Title: Finally, the seizure action on the Hot Mix Daumbar Plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.