...अखेर कर्जमाफीची दहावी यादी आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 10:20 PM2018-10-04T22:20:07+5:302018-10-04T22:21:18+5:30

मागील चार महिन्यापासून कर्जमाफीच्या दहाव्या ग्रीन यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ९ हजार ४०७ शेतकऱ्यांची ग्रीन यादी गुरूवारी (दि.४) बँकेला प्राप्त झाली असून या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज खाते शून्य केले जाणार आहे.

Finally, there was a list of debt waivers on the list | ...अखेर कर्जमाफीची दहावी यादी आली

...अखेर कर्जमाफीची दहावी यादी आली

Next
ठळक मुद्दे९ हजार ४०७ शेतकऱ्यांचा समावेश : २५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त, बँका लागल्या कामाला

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील चार महिन्यापासून कर्जमाफीच्या दहाव्या ग्रीन यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ९ हजार ४०७ शेतकऱ्यांची ग्रीन यादी गुरूवारी (दि.४) बँकेला प्राप्त झाली असून या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज खाते शून्य केले जाणार आहे. यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी सुध्दा बँकाना प्राप्त झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शासनाने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. यासाठी जिल्ह्यातील ८६ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले होते. यापैकी ६० हजार शेतकऱ्यांना आत्तापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. मात्र उर्वरित २६ हजारावर शेतकरी मागील वर्षभरापासून कर्जमाफीपासून वंचित होते.
या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने खरीप हंगामात नवीन पीक कर्जाची उचल करण्यापासून वंचित राहावे लागले. तर काही शेतकऱ्यांना सावकारांकडून व्याजाने कर्ज घेवून कर्जाची उचल करावी लागली. वर्षभराचा कालावधी लोटूनही कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये यावरुन संभ्रमाचे वातावरण होते. महाआॅनलाईनकडून बँकाना कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची ग्रीन यादी पाठविण्यास विलंब केला जात होता. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते.
लोकमतने जिल्ह्यातील कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा सातत्याने लावून धरला. कर्जमाफीस विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती वाढता असंतोष पाहून शासनाने जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ९ हजार ४०७ शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी बँका आणि जिल्हा निंबंधक कार्यालयाला पाठविली आहे. यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी सुध्दा उपलब्ध करून दिला असून येत्या दोन तीन दिवसात कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सदर रक्कम जमा करून त्याचे कर्ज खाते शून्य केले जाणार आहे. त्यामुळे संकटातील शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.
येलो यादीतील किती शेतकरी पात्र ठरणार
पंधरा दिवसांपूर्वीच जिल्हा बँकेला महाआॅनलाईनकडून १८ हजार ७२५ शेतकऱ्यांची येलो यादी पडताळणीसाठी प्राप्त झाली. सध्या या यादीची पडताळणी सुरू आहे. त्यामुळे पडताळणीनंतर या यादीतील किती शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरतात याकडे लक्ष लागले. ही येलो यादी पडताळणी करुन तिचे ग्रीन यादीत रुपातंर करण्यासाठी पुन्हा महॉआॅनलाईनकडे पाठविली जाणार आहे.
आता प्रतीक्षा शेवटच्या यादीची
जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी आत्तापर्यंत बँकेला प्राप्त झाली आहे. आता अखेरची अकारावी यादी येणार असून त्यात किती शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरतात हे कळणार आहे. बँक अधिकाऱ्यांच्या मते ही शेवटची यादी असणार आहे. त्यामुळे या यादीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Finally, there was a list of debt waivers on the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.