कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या विधवा महिलेस आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:29 AM2021-09-19T04:29:52+5:302021-09-19T04:29:52+5:30
बोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवनियुक्त ग्रामपंचायत सरपंच चार दिवसीय प्रशिक्षणासाठी नागपूरला गेले होते. आपलीही एक सामाजिक बांधीलकी समजून ...
बोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवनियुक्त ग्रामपंचायत सरपंच चार दिवसीय प्रशिक्षणासाठी नागपूरला गेले होते. आपलीही एक सामाजिक बांधीलकी समजून गरजूंना मदत करण्यासाठी प्रशिक्षणार्थी सरपंचांचे हात पुढे सरसावले. वनामती प्रशिक्षण केंद्रातील एका कामगाराचा कोविडमुळे मृत्यू झाल्याने त्याचा संसार उघड्यावर पडला. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा या उदात्त हेतूनी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंचांनी प्रशिक्षणाच्या समारोपीय प्रसंगी आर्थिक मदत करून सामाजिक बांधीलकी जोपासली.
तालुक्यातील अलीकडेच निवडून आलेल्या ग्रामपंचायत सरपंचाचे चार दिवसीय निवासी प्रशिक्षण नागपूर येथील वनामती प्रशिक्षण केंद्रात घेण्यात आले. यात बोंडगावदेवीच्या सरपंच प्रतिमा बोरकर, सिलेझरीच्या सुनीता ब्राम्हणकर, माहुरकुड्याचे लक्ष्मीकांत नाकाडे, केशोरीचे नंदकुमार गहाणे, बाराभाटीचे महादेव प्रधान, कुंभिटोलाचे हिवराज औरासे, बोरीचे मधुकर ठाकरे, कन्हाळगावचे जयपाल ताराम, परसटोलाचे रामू कुंभरे, बोंडगाव (सुरबन)चे पुष्पा डोंगरवार, ईळदाचे संगीता कळयाम सहभागी झाले होते.