लाॅकडाऊनमुळे लघुउद्योजकांची आर्थिक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:30 AM2021-05-18T04:30:18+5:302021-05-18T04:30:18+5:30
गोंदिया : मागील वर्षभरापासून सर्वत्र कोविडचा प्रादुर्भाव असल्याने वारंवार लॉकडाऊन केले जात आहे. यामुळे व्यापारी आणि लघुउद्योजकांची आर्थिक कोंडी ...
गोंदिया : मागील वर्षभरापासून सर्वत्र कोविडचा प्रादुर्भाव असल्याने वारंवार लॉकडाऊन केले जात आहे. यामुळे व्यापारी आणि लघुउद्योजकांची आर्थिक कोंडी झाली आहे. उद्योगधंदे ठप्प असल्याने त्यांच्यासमोर विविध प्रश्न निर्माण झाले आहेत.
गोंदियासारख्या साधारण जिल्ह्यात लॉकडाऊनचा विशेष परिणाम जाणवत आहे. कृषी, व्यापार, विविध व्यापारी दुकानदार, उद्योजक, लघुउद्योग, हॉटेल, ठेलेवाले, टपरीवाले, चैनी वस्तू जसे मोबाइल शॉपी, फर्चिनर उद्योग असे बहुतेक व्यापारी दुकानांचा उद्योगधंदा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने असलेला माल विकू शकत नाही. तसेच नव्याने माल आणू शकत नाही. व्यापार करणार कसा? मायबाप सरकार म्हणते सर्व ठीक आहे. पहिली, दुसरी, तिसरी लहर पसरवून हा विषाणू हैराण करीत आहे. परिणाम काय? तर सगळीकडे उद्योग ठप्प आहेत. सरकार मदत देण्यास तयार नाही. कर्ज काढून दुकान सुरू केले. पण कर्जफेड कशी करायची, घर चालवायचे ही चिंता व्यापाऱ्यांना सतावत आहे. गावागावातले व्यापार-उद्योग डबघाईला येणार नाही काय? उच्चमध्यमवर्गीय अशी मंडळी मोठ्या प्रमाणात विदेशी कंपन्यांमार्फत विविध वस्तू ऑनलाइन खरेदी करीत आहेत. कोरोनाची भीती घालून स्थानिक व्यापारावर संक्रांत आणि ऑनलाइन कंपन्यांची दिवाळी,असे विरोधाभासी चित्र दिसून येत आहे.