दोघींच्या लग्नासाठी साहित्यासह आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 09:43 PM2019-04-22T21:43:59+5:302019-04-22T21:44:19+5:30

अल्पायुष्यात पतीने साथ सोडून दिल्यानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी गावातील वंदना मेश्राम व रिना ठवरे यांच्यावर आली आहे. त्यातच दोघींच्या मुलींचा विवाह तोंडावर आला असून त्यांच्या मुलींच्या लग्नाचा आर्थिक भार उचलण्याची मनीषा अंगी बाळगणाऱ्या एका महिला वनअधिकाऱ्यांकडून मिळालेली मदत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे व वनसमितीचे अध्यक्ष डॉ. शामकांत नेवारे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.

Financial help with literature for both of them | दोघींच्या लग्नासाठी साहित्यासह आर्थिक मदत

दोघींच्या लग्नासाठी साहित्यासह आर्थिक मदत

Next
ठळक मुद्देविधवा मातांना हातभार : माणुसकी जिवंत असल्याची प्रचिती

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : अल्पायुष्यात पतीने साथ सोडून दिल्यानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी गावातील वंदना मेश्राम व रिना ठवरे यांच्यावर आली आहे. त्यातच दोघींच्या मुलींचा विवाह तोंडावर आला असून त्यांच्या मुलींच्या लग्नाचा आर्थिक भार उचलण्याची मनीषा अंगी बाळगणाऱ्या एका महिला वनअधिकाऱ्यांकडून मिळालेली मदत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे व वनसमितीचे अध्यक्ष डॉ. शामकांत नेवारे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.
कमावत्या पतीच्या निधनानंतर हलाखीचे जीवन जगून कुटूंबाचा चरितार्थ चालविणाऱ्या येथील वंदना मेश्राम व रिना ठवरे यांच्या मुलींच्या लग्नासाठी साामाजिक दानदात्यांकडून अन्नधान्यासह ईतर साहित्याची मदत करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अमरचंद ठवरे यांनी केले होते. त्यानुसार गोंदियाच्या सामाजिक कार्यकर्ता प्रा. डॉ. सविता बेदरकर यांच्या सहकार्याने महिला वनाधिकाऱ्यांनी तेलाचे टीन, गहू, दाळ, साखर, तांदूळ, मसाला, साडी-चोळी व रोख रक्कमेची व्यवस्था करुन दिली.
त्या महिला अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या मदतीचे वाटप येथील वंदना मेश्राम व रिना ठवरे यांना माजी जि.प.अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. शामकांत नेवारे यांच्या हस्ते करण्यात आले.
यातील वंदना यांच्या मुलीचा विवाह २६ एप्रिल रोजी तर रिना ठवरे यांच्या मुलीचा विवाह १८ मे रोजी होऊ घातला आहे.

Web Title: Financial help with literature for both of them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.