गोवर-रु बेला लसीकरणामध्ये सुटलेल्या मुलांचा शोध घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:34 AM2018-12-30T00:34:32+5:302018-12-30T00:35:16+5:30

गोवर रुबेला मोहिमेचा लाभ पालकांनी घेवून आपल्या मुला-मुलींना गोवर रूबेला हे दोन्ही रोग होण्यापासून वाचवावे. यंत्रणांनी या मोहिमेला शंभर टक्के यशस्वी करण्याकरीता शाळा व अंगणवाडीतील व शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून गोवर रु बेला लसीकरणाचे प्रमाण वाढवावे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.

Find out the children who have lost weight in the Gore-Ru Bella vaccination | गोवर-रु बेला लसीकरणामध्ये सुटलेल्या मुलांचा शोध घ्या

गोवर-रु बेला लसीकरणामध्ये सुटलेल्या मुलांचा शोध घ्या

Next
ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक, दुसरा टप्पा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोवर रुबेला मोहिमेचा लाभ पालकांनी घेवून आपल्या मुला-मुलींना गोवर रूबेला हे दोन्ही रोग होण्यापासून वाचवावे. यंत्रणांनी या मोहिमेला शंभर टक्के यशस्वी करण्याकरीता शाळा व अंगणवाडीतील व शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून गोवर रु बेला लसीकरणाचे प्रमाण वाढवावे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी त्या बोलत होत्या.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. ई.हाश्मी, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. अनंत चांदेकर उपस्थित होते. चांदेकर यांनी मोहिमेला यशस्वी करण्यासाठी आत्तापर्यंत केलेल्या सर्व घटनाक्रमांचा आढावा सभेत सादर केला. ९ महिने ते १५ वर्षापर्यंत जवळपास ३ लाख ६५,९५८ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे लक्ष पूर्ण करण्यासाठी प्रत्येक शाळेत लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले. यात ९० टक्के पेक्षा कमी लसीकरण झालेल्या शाळा ३५५, ९१ टक्के पेक्षा जास्त लसीकरण झालेल्या शाळा ७५७, शंभर टक्के लसीकरण झालेल्या शाळा ३५२ आहेत. सुटलेल्या शाळेतील मुलांना उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रु ग्णालय व जिल्हा रु ग्णालयात कव्हर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
३ लाख ६५ हजार ९५८ पैकी ५४ डिसेंबर २०१८ पर्यंत २ लाख ७५ हजार १८७ लाभार्थी कव्हर झाल्याची माहिती बैठकीत दिली.
सभेला डब्ल्यू.एच.ओ.चे जिल्हा समन्वयक डॉ.एफ.ए.मेश्राम, आदिवासी विकास प्रकल्प सहायक अधिकारी व्ही. तितीरमारे, आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ.निर्मला जयपुरीया, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सी.डब्ल्यू वंजारे, डॉ.विवेक येळे यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते. सभेच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक ए.एस.वंजारी यांनी सहकार्य केले.

Web Title: Find out the children who have lost weight in the Gore-Ru Bella vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.