यशाची वाट शोधायची असते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:18 AM2017-12-30T00:18:16+5:302017-12-30T00:19:07+5:30
मानवी जीवनात सुख-दु:ख, यशापयश या दोन्हीही गोष्टी आहे. म्हणूनच जीवनाला अर्थ आहे, अन्यथा जीवन नीरस झाले असते. संकटे, अपयश यांनी खचून न जाता जीवनात यशाची वाट शोधायची असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : मानवी जीवनात सुख-दु:ख, यशापयश या दोन्हीही गोष्टी आहे. म्हणूनच जीवनाला अर्थ आहे, अन्यथा जीवन नीरस झाले असते. संकटे, अपयश यांनी खचून न जाता जीवनात यशाची वाट शोधायची असते. विद्यार्थ्यानी चांगले चरित्र निर्माण करावे, ज्यांना यश मिळाले त्याचे अभिनंदन व ज्यांना अपयश आले जे बक्षीसाचे मानकरी ठरले नाहीत त्यांनी दु:खी न होता पुन्हा मोठ्या जोमाने प्रयत्न करुन यशापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन संस्थेचे सचिव तथा प्राचार्य अनिल मंत्री यांनी केले.
सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सरस्वती विद्यानिकेतन प्राथ. शाळा, सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेंट, जीएमबी इंग्लीश मिडीयम हायस्कूलच्या संयुक्त वार्षिकोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे, उपाध्यक्ष विजय कापगते, तहसीलदार सी.आर.भंडारी, संस्थेचे कोषाध्यक्ष जयप्रकाश भैय्या, संस्था सदस्य तथा नगरपंचायत सदस्य सर्वेश भुतडा, गटशिक्षणाधिकारी टी.बी.भेंडारकर, पर्यवेक्षिका विना नानोटी, जीएमबीचे मुख्याध्यापक मुकेश शेंडे, एसडीसीच्या प्राचार्य सुनिता डांगे, सरीता शुक्ला, संयोजक के.के.लोथे, प्रा.इंद्रनिल काशीवार, विष्णू चाचेरे, विद्यार्थी प्रतिनिधी जयेश रुखमोडे, सोनल साखरे उपस्थित होते.
याप्रसंगी नगराध्यक्ष शहारे यांनी, विद्यार्थ्याची प्रतिरुपी बाग ही शाळा असते, विद्यार्थी आपल्या उत्तुंग बुद्धीच्या बळावर ज्ञानप्राप्ती करतात, आजचे विद्यार्थी हे भविष्याचे शिल्पकार आहेत. मोठे होण्यासाठी वर्तमान पत्राच्या पुरवण्यांचे वाचन करा व यश मिळवा असे मत व्यक्त केले.
गटशिक्षणाधिकारी भेंडारकर यांनी, मानवी जीवनात बक्षीस हे अमूल्य आहे. प्रगतीसाठी प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले. पश्चात पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. संचालन अर्चना गुरनुले व ज्ञानेश्वर रोकडे यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी सहकार्य केले.