वाहतूक नियम तोडणाऱ्यांकडून ७६ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 06:00 AM2020-01-16T06:00:00+5:302020-01-16T06:00:15+5:30

वाहन चालकांच्या सुरक्षेततेसाठी शासनाने अनेक नियम घालून दिले असले तरी वाहतूक नियमांची पायमल्ली होण्याचे काम दररोजच होत आहे. या वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहन चालकांना आर्थिक दंड ही सोसावा लागतो. जिल्हा पोलिसांनी सन २०१९ या वर्षात ३१ हजार ११७ प्रकरणातून ७५ लाख ८२ हजार ४०० रुपयाचा दंड वसूल केला यात अवैध प्रवाशीचे ८८८ प्रकरणे तर इतर ३० हजार २२९ प्रकरणे आहेत.

A fine of Rs 76 Lac | वाहतूक नियम तोडणाऱ्यांकडून ७६ लाखांचा दंड वसूल

वाहतूक नियम तोडणाऱ्यांकडून ७६ लाखांचा दंड वसूल

googlenewsNext
ठळक मुद्दे२०१९ ची कारवाई : ३१ हजार ११७ वाहनांवर केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वाहतूक नियम तंतोतंत पाळले जावेत यासाठी जिल्हा वाहतूक शाखेतर्फे व संबंधीत पोलीस ठाण्यांतर्फे कारवाई केली जाते. वाहतूक नियमांचा भंग झाल्यास अपघात व्हायला वेळ लागत नाही. वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी व वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी गोंदिया जिल्हा वाहतूक पोलीस व वाहतूक यंत्रणा सांभाळणाऱ्या जिल्हा भरातील पोलिसांनी सन २०१९ मध्ये ३१ हजार ११७ वाहनावर कारवाई करुन तडजोड शुल्क पोटी ७५ लाख ८२ हजार ४०० रुपये वसूल केले आहेत.
वाहन चालकांच्या सुरक्षेततेसाठी शासनाने अनेक नियम घालून दिले असले तरी वाहतूक नियमांची पायमल्ली होण्याचे काम दररोजच होत आहे. या वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहन चालकांना आर्थिक दंड ही सोसावा लागतो. जिल्हा पोलिसांनी सन २०१९ या वर्षात ३१ हजार ११७ प्रकरणातून ७५ लाख ८२ हजार ४०० रुपयाचा दंड वसूल केला यात अवैध प्रवाशीचे ८८८ प्रकरणे तर इतर ३० हजार २२९ प्रकरणे आहेत. २०१८ मध्ये २२ हजार ९२६ प्रकरणातून ५६ लाख २६ हजार ४०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला होता. परंतु २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात अनियंत्रित वाहन चालविणे किंवा वाहतूक नियमांची पायमल्ली करणाºया लोकांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला आहे. सन २००९ पासून २०१९ पर्यंत या ११ वर्षाची परिस्थिती पाहता दिवसेंदिवस वाहतूक नियमांची पायमल्ली होत असल्याचे लक्षात येत आहे. परिणामी त्या वाहन चालकांवर दंड ही आकारला जात आहे.
सन २००९ मध्ये ५ हजार ९०१ प्रकरणातून ८ लाख ९३ हजार ६०० रुपये, सन २०१० मध्ये ८ हजार ६३१ प्रकरणातून २० लाख २४ हजार ६०० रुपये, सन २०११ मध्ये १३ हजार ८४१ प्रकरणातून ३० लाख ६६ हजार २०० रुपये, सन २०१२ मध्ये २० हजार ९४९ प्रकरणातून ३४ लाख ४५ हजार २०० रुपयाचा दंड, सन २०१३ मध्ये १८ हजार ९६८ प्रकरणातून २३ लाख ३६ हजार ३०० रुपये, सन २०१४ मध्ये २१ हजार २२४ प्रकरणातून ३० लाख ४४ हजार ४०० रुपये, सन २०१५ मध्ये ३० हजार ९३ प्रकरणातून ५० लाख ६१ हजार रुपये, सन २०१६ मध्ये २२ हजार ३०४ प्रकरणातून ३८ लाख ६७ हजार ९०० रुपये, सन २०१७ मध्ये १५ हजार ३१२ प्रकरणातून १८ लाख ६० हजार ६०० रुपये तर सन २०१८ मध्ये २२ हजार ९२६ प्रकरणातून ५६ लाख २६ हजार ४०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. सन २०१९ मध्ये जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने कारवाई केली आहे.

१४४ अपघातात १५८ जणांचा मृत्यू
जिल्ह्यातील पोलीस विभागांमार्फत दुचाकी वाहन चालकांना हेलमेटची सक्ती केल्यामुळे प्राणांतिक अपघातात घट झाली आहे. परिणामी २०१८ च्या तुुलनेत २०१९ मध्ये १६ जणांचा मृत्यूची घट झाली आहे. सन २०१८ मध्ये एकूण अपघात २९० झाले होते. तर २०१९ मध्ये २६२ अपघात घडले आहेत. यापैकी २०१८ मध्ये १५२ प्राणांतिक अपघातात १७४ जणांचा मृत्यू झाला होता. तर २०१९ मध्ये १४४ प्राणांतिक अपघातात १५८ जणांचा मृत्यू झाला आहे. २६२ अपघातात ६६ गंभीर जखमी, ३५ किरकोळ जखमी झाले आहेत. तर १७ लोक हेल्मेटमुळे जखमी झाले नाहीत. तत्कालीन पोलीस अधीक्षक हरिश बैजल यांनी गोंदिया जिल्ह्यात हेल्मेट सक्ती मोहीम जोमाने राबविली होती. या हेलमेट सक्तीचा फायदा म्हणून प्राणांतिक अपघातात घट दिसून आली आहे.

Web Title: A fine of Rs 76 Lac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.