प्रकल्प कार्यालयावर निषेध मोर्चा काढणाऱ्या २० जणांवर गुन्हा दाखल
By admin | Published: March 9, 2017 12:34 AM2017-03-09T00:34:48+5:302017-03-09T00:34:48+5:30
देवरीच्या मकरधोकडा येथील आदिवासी आश्रमाशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर परिचराने बलात्कार केला.
गोंदिया : देवरीच्या मकरधोकडा येथील आदिवासी आश्रमाशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर परिचराने बलात्कार केला. या घटनेसह अनेक घटनांमध्ये आदिवासी विद्यार्थिनीवर अत्याचार होत असल्याने संतापलेल्या आदिवासी समाजबांधवांनी शुक्रवारी दुपारी १.३० वाजता देवरीच्या प्रकल्प कार्यालयावर आंदोलन केले.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर टायर जाळून वाहतुक ठप्प केली. त्यामुळे २० जणांवर देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक सुर्यकांत सपताळे यांच्या तक्रारीवरुन आरोपी संतोष मडावी रा. देवरी, नागदेव पुनाराम आचले रा. टोयागोंदी, लोकनाथ तितराम रा.देवरी, रामेश्वर कुनोटे रा. भर्रेगाव, चेतन उईके रा.देवरी, दिलीप कुंभरे रा.देवरी, भरत मडावी रा. खुर्शीपार, अविरत सयाम रा.देवरी, टिकाराम यातवारे रा.देवरी, सुभाष नरेटी रा.देवरी, उमराव मरस्कोल्हे, मधु दिहारी, टी.एस. सलामे, रामेश्वर नेताम, जगत नेताम, भारती टेंभुरकर, सीमा मुरकुटे, शारदा उईके, शालू पंधरे, अनुप इळपाते सर्व रा. देवरी यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १४३, ३४१, १८६,१८८ सहकलम १३५ मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक करण्यात आली नाही.