आठ वाहनचालकांवर गुन्हा दाखल

By Admin | Published: December 30, 2015 02:22 AM2015-12-30T02:22:56+5:302015-12-30T02:22:56+5:30

रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मोहीम गोंदिया पोलिसांनी सुरू केली आहे.

FIR filed against eight drivers | आठ वाहनचालकांवर गुन्हा दाखल

आठ वाहनचालकांवर गुन्हा दाखल

googlenewsNext


गोंदिया : रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मोहीम गोंदिया पोलिसांनी सुरू केली आहे. त्यानुसार सोमवारी विविध पोलीस ठाण्यांत या संबंधित आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये, डुग्गीपार पोलिसांनी फुटाळा येथील रस्त्यावर उभा असलेला ट्रक सीजी ०४/झेडसी ५५६१ चा चालक महेंद्रसिंग नितुसिंग (२८,रा. भानपुरी जि. रायपूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रकारे फुटाळा येथे सोमवारी सकाळी ८.५० वाजता करण्यात आली असून यात नागपुरच्या पारडी येथील नरेंद्र गुलाबराव पवार (३०) याने ट्रक सीजी ०४/जेडी ३५९६ रस्त्यावर उभा केला होत. तर सकाळी ८.३५ वाजता ट्रक एमएच १५/एजी५३० ला आरोपी बाबू बाबुराव जाधव (२५,रा. करंजगाव, तालुका निफळ जि. नाशिक) याने रस्त्यावर उभा केला होता त्यामुळे त्यावरही कारवाई करण्यात आली.
अशाचप्रकारे फुटाळाच्या रस्त्यावर सकाळी ८.४० वाजता ट्रक सीजी०४/एचसी ३७७५ या वाहनाला रस्त्यावर उभा करून ठेवणाऱ्या संदीपकुमार सत्यनारायण मौर्य (रा. गिरगाव, ता. भानपुरी, जि. रायपूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर सकाळी ८.३० वाजता बरगुनिया बाका येथील प्रमोदकुमार शिवण यादव (२२) याने ट्रक एनएल ०१/के-८५५३ या वाहनाला रस्त्यावर उभे करून ठेवल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने सदर सर्व घटनासंदर्भात डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम २८३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
त्याचप्रकारे आमगावच्या कामठा चौकात मालवाहक एमएच ३५/के २२४७ ला आरोपी हेमराज उदेलाल डहारे (२८,रा. डोंगरगाव) याने सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता रस्त्यावर उभे करून ठेवल्याने त्याच्या विरूध्द आमगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गोरेगाव पोलिसांनी गोरेगावच्या बसस्थानकावर उभा असलेला आॅटो एमएच ३५/२१३३ चालक राम रामकृष्ण चापने (३८,रा. सिव्हील लाईन गोंदिया) याच्यावर सोमवारी सकाळी ११ वाजता कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.
तर रावणवाडी येथे उभा असलेला ट्रक एमएच ३१/सीक्यू ५७५८ या वाहनाला आरोपी चुन्नीलाल सुरजलाल रहांगडाले (२९, रा.निलागोंदी) याने रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभे करून ठेवल्यामुळे त्याच्यावर रावणवाडी पोलिसांनी भादंविच्या कलम २८३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)

मद्यपी वाहनचालकांवरही गाज
रस्त्यावर वाहन उभे करून अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली जात असतानाच पोलिसांनी मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवरही कारवाई केली. यात शहराच्या जयस्तंभ चौकात सोमवारी रात्री दुचाकी एमएच ३५/वाय ६०५४ चालक उमेशकुमार हेमराज सव्वालाखे (२७,रा.सावरटोला), प्रभात टॉकीज चौकात दुचाकी क्रमांक एमएच३५/व्ही ४४३५ चालक दामेंद्र वसंतराव बिसेन (२५,रा. सेलटॅक्स कॉलोनी फुलचूर पेठ), भवानी चौकात दुचाकी क्रमांक एमएच ३५/एक्स ३१२६ चालक अशोक यशवंत नागरीकर (५२,सावराटोली), मनोहर चौकात वाहन एमएच ३५/टी ९६०० चालक मुकेश शोभेलाल ताराम (४०, कारंजा) यांना पकडून त्यांची सर्वांची अ‍ॅनालायजर ने चाचणी करून गोंदिया शहर पोलिसांनी मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय ग्रामीण पोलिसांनी फुलचूर नाका येथे सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता मोटारसायकल क्रमांक एमएच ३५/यु ९५१२ स्वार संतोष बाबु गायधने (३८,रा. कलपाथरी) याचीही चाचणी करून त्याला मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविताना पकडून गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: FIR filed against eight drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.