प्रशिक्षण न देताच हंगामी वनमजुरांच्या हातात फायर ब्लोअर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:28 AM2021-04-10T04:28:56+5:302021-04-10T04:28:56+5:30

गोंदिया : नवेगावबांध- नागझिरा अभयारण्य व पिटेझरी वन परिक्षेत्रात वणवा विझविताना त्यात होरपळून तीन वनमजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ...

Fire Blower in the hands of seasonal forest workers without training () | प्रशिक्षण न देताच हंगामी वनमजुरांच्या हातात फायर ब्लोअर ()

प्रशिक्षण न देताच हंगामी वनमजुरांच्या हातात फायर ब्लोअर ()

Next

गोंदिया : नवेगावबांध- नागझिरा अभयारण्य व पिटेझरी वन परिक्षेत्रात वणवा विझविताना त्यात होरपळून तीन वनमजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.८) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेनंतर हंगामी वनमजुरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आला असून या वनमजुरांनी प्रशिक्षण न देताच फायर ब्लोअर मशीन हातळण्यास सांगितले जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली.

प्राप्त माहितीनुसार नवेगाबांध-नागझिरा अभयारण्य व पिटेझरी वन परिक्षेत्राच्या कक्ष क्रमांक ९७ मध्ये गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास वणवा लागला. त्यानंतर हंगामी वनमजुरांनी तो विझविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, हवेमुळे वणवा अधिक भडकल्याने यात होरपळून तीन मजुरांचा मृत्यू झाला, तर दोन मजूर गंभीर जखमी झाले. या कक्ष क्रमांकामध्ये वणवा विझविण्याचे कार्य सुरू होते तेव्हा त्यांच्यासोबत एकही नियमित वन अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याची माहिती आहे. आग विझविताना भाजल्यानंतर एक मजूर दीड किलोमीटर अंतरावरील कार्यालयाकडे येऊन माहिती दिल्यानंतर चार तासांनी अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्याची माहिती आहे. या घटनेनंतर या विभागानेच सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचे बाेलले जाते.

मागील दोन वर्षांपासून नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील फायर लाइन कापणे, पर्यटकांसाठी फिरण्याकरिता आणि जंगलात गस्त घालण्यासाठी अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करणे, मुरूम पसरविणे, अशी कामे अंदाजपत्रकात नमूद करण्यात आली आहेत. त्यानुसार करण्यात आली नसल्याची माहिती आहे.

............

साहित्य उपलब्ध करून देण्याकडे होतेय दुर्लक्ष

फायर लाइन योग्य रीतीने कापण्याचे व वाळलेला कचरा व्यवस्थापन आणि अंतर्गत रस्ते सुरळीत करणे, आग विझविण्याचे साहित्य उपलब्ध ठेवणे, या बाबींकडे लक्ष दिले असते तर ही जीवितहानी टळली असती. या सर्व प्रकारची सखोल चौकशी करून यातील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीसुद्धा सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांनी केली आहे.

..........

वन्यजीव विभागाचा अनागोंदी कारभार पुढे

या घटनेनंतर हंगामी वनमजुरांनी नाव न लिहिण्याच्या अटीवर माहिती दिली. त्यात वणवा विझविताना बरेचदा त्यांच्यासोबत अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसतात. फायर ब्लोअर मशीन हातळण्याचे प्रशिक्षणसुद्धा अद्यापही देण्यात आले नाही. तर जंगलात वावरताना सुरक्षेच्या दृष्टीने बूट किंवा इतर साहित्य पुरवठाच केला जात नसल्याची माहिती आहे.

......

उपाययोजनांचा अभाव

नवेगावबांध- नागझिरा अभायरण्यात झालेल्या घटनेनंतर मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे, सावन बहेकार, शाहिद खान यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यात वन आणि वन्यजीव विभागाचा अनागोंदी कारभार पुढे आला. आगीच्या घटनांवर वेळीच नियंत्रण केले जात नसल्याने मौल्यवान वनसंपत्ती नष्ट होत असल्याची बाब पुढे आली. तसेच मजुरांच्या दृष्टीने सुरक्षाविषयक उपाययोजनांचा सुद्धा अभाव दिसून आला.

..

Web Title: Fire Blower in the hands of seasonal forest workers without training ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.