धानाच्या कोठारात लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 09:38 PM2019-06-07T21:38:43+5:302019-06-07T21:39:06+5:30
जवळील ग्राम चुटिया येथील रहिवासी यादवराव देवीलाल टेंभरे यांच्या घरातील धानाच्या कोठाराला आग लागली. ही शुक्रवारी (दि.७) सकाळी ९ वाजता दरम्यान लागलेल्या या आगीत कोठारातील धान, शेतीचे साहित्य जळाल्याने त्यांचे सुमारे सात लाख रूपयांचे नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जवळील ग्राम चुटिया येथील रहिवासी यादवराव देवीलाल टेंभरे यांच्या घरातील धानाच्या कोठाराला आग लागली. ही शुक्रवारी (दि.७) सकाळी ९ वाजता दरम्यान लागलेल्या या आगीत कोठारातील धान, शेतीचे साहित्य जळाल्याने त्यांचे सुमारे सात लाख रूपयांचे नुकसान झाले.
टेंभरे यांच्या घरातच धानाचे कोठार असून त्यात त्यांचे सुमारे ५० पोती धान, पाच पोती तांदूळ, फर्नीचर व शेतीचे साहित्य ठेवलेले होते. शुक्रवारी (दि.७) सकाळी अचानक आग लागल्याने त्यांनी येथील अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी पाठविण्यात आल्या. या गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र कोठारातील साहित्य जळून खाक झाले व टेंभरे यांचे सुमारे सात लाख रूपयांचे नुकसान झाले. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात कृषी उपयोगी साहित्य जळाल्याने टेंभरे यांनी सांगितले.
ही नेमकी कशामुळे लागली यामागील कारण कळू शकले नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागातील चालक महेंद्र बांते, प्रकाश शर्मा, फायरमेन राजेश यादव, शहबाज सय्यद, आदित्य भाजीपाले, राजेंद्र शेंडे व गावकऱ्यांनी सहकार्य केले.