अग्निशमन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 09:56 PM2018-06-11T21:56:22+5:302018-06-11T21:57:01+5:30

आणिबाणीच्या स्थितीत महत्वाची भूमिका बजाविणाºया येथील अग्निशमन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. पदे रिक्त असल्यामुळे विभागाने आणखी २५ कर्मचाºयांची मागणी केली असून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. रिक्त पदांमुळे मात्र विभागाच्या सेवेवर परिणाम पडत असून शिवाय याचा ताण कार्यरत कर्मचाºयांवर येत आहे.

Fire Department receives vacant positions | अग्निशमन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण

अग्निशमन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण

Next
ठळक मुद्देआणखी २५ कर्मचाऱ्यांची मागणी : शासनाकडे पाठविला प्रस्ताव

कपिल केकत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आणिबाणीच्या स्थितीत महत्वाची भूमिका बजाविणाºया येथील अग्निशमन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. पदे रिक्त असल्यामुळे विभागाने आणखी २५ कर्मचाºयांची मागणी केली असून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. रिक्त पदांमुळे मात्र विभागाच्या सेवेवर परिणाम पडत असून शिवाय याचा ताण कार्यरत कर्मचाºयांवर येत आहे.
कोठेही आग लागल्याची घटना घडल्यास सर्वप्रथम आठवण येते ती अग्निशमन वाहनाची. शिवाय आणिबाणीच्या परिस्थितीतही अग्निशमन विभाग धावून येतो. यावरून अग्निशमन विभागाचे महत्व लक्षात येते. म्हणूनच अग्निशमन विभागाला पाहिजे त्या सुविधा पुरविणे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. अग्निशमन विभाग परिपूर्ण असल्यास त्याचा फायदा जनतेलाच मिळतो. मात्र खेदाची बाब अशी की, येथील अग्निशमन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. विभागातील काही मुख्य पदांचाच विचार केल्यास तिही पूर्णपणे भरलेली नसल्याचे दिसत आहे.
विभागातील या रिक्त पदांमुळे एकतर सेवेवर परिणाम पडतो. शिवाय विभागात कार्यरत कर्मचाºयांवर याचा ताण पडत आहे. विशेष म्हणजे, शासनाने अग्निशमन विभागासाठी २५ पदे मंजूर केल्याची माहिती आहे. त्यानुसार, येथील अग्निशमन विभागाकडून पदनिहाय किती कर्मचारी लागतील याचा प्रस्तावच शासनाला पाठविण्यात आला आहे. शासनाक डून २५ पदांना मंजुरी मिळाल्यास व ही पदे भरली गेल्यास अग्निशमन विभागाचा कारभार आणखी सुरळीत होणार असे अपेक्षीत आहे.
अशी आहेत रिक्त पदे
अग्निशमन विभागातील मुख्य काही पदांचीच पाहणी केल्यास आजघडीला लिडींग फायरमनची दोन पदे मंजू असून त्यातील एक पद रिक्त आहे. वाहन चालक-आॅपरेटरची चार पदे मंजूर असून त्यातील दोन पदे रिक्त आहेत. फायरमनची सहा पदे रिक्त असून एक पद रिक्त आहे. अशाप्रकारे १२ पैकी चार पदे रिक्त आहे. त्यामुळे विभागात सध्या ७ वाहनचालक कंत्राटी तत्वावर कार्यरत असून १२ फायरमन रोजंदारीने काम करीत आहेत. यावर विभागाने एक लिडींग फायरमन, १० वाहनचालक -आॅपरेटर व १४ फायरमन अशी एकूण २५ पदांची मागणी केली आहे.
५ वर्षांपासून अग्निशमन अधिकाऱ्यांचे पद रिक्त
सुमारे पाच वर्षांपासून येथील अग्निशमन अधिकाऱ्यांचे पद रिक्त पडून आहे. त्यामुळे येथील लिडींग फायरमनकडे प्रभार दिला जात असल्याची परंपरा सुरू आहे. सध्या लिडींग फायरमन छबीलाल पटले यांच्याकडे अग्निशमन अधिकाºयांचा प्रभार देण्यात आला आहे. याशिवाय अग्निशमन सह अधिकाºयांचेही पद मागील १० वर्षांपासून रिक्त पडून असल्याची माहिती आहे. विभागातील अशी महत्वाची पदे रिक्त पडलेली असून जिल्हा व नगर परिषद प्रशासनाचे कार्य किती सुरळीतपणे सुरू आहे याची प्रचिती येते.
आणखी दोन वाहन मिळणार
येथील अग्निशमन विभागाकडे आजघडीला पाच अग्निशमन वाहन आहेत. याशिवाय आणखी दोन वाहन मिळणार आहेत. म्हणजेच अग्निशमन विभागाकडे वाहनांची कमतरता नाही. मात्र कर्मचारी कमी असल्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांकडून काम काढून घेतले जात आहे.

Web Title: Fire Department receives vacant positions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.