गिरोल्यात विधवेच्या घराला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 09:12 PM2018-02-04T21:12:23+5:302018-02-04T21:13:17+5:30

जवळील ग्राम गिरोला येथील पुस्तकला प्रेमलाल पंधरे (४७) या गरीब विधवा महिलेच्या घराला रविवारी (दि.४) सकाळी १०.३० वाजतादरम्यान अचानक आग लागली.

A fire in a widow's house in Girolah | गिरोल्यात विधवेच्या घराला आग

गिरोल्यात विधवेच्या घराला आग

Next
ठळक मुद्दे सर्व सामान भस्मसात : १६ हजार रोख रकमेसह दीड लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : जवळील ग्राम गिरोला येथील पुस्तकला प्रेमलाल पंधरे (४७) या गरीब विधवा महिलेच्या घराला रविवारी (दि.४) सकाळी १०.३० वाजतादरम्यान अचानक आग लागली. या आगीत त्यांच्या घरातील एकूण एक वस्तू जळून भस्मसात झाली असून यात रोख १६ हजार रुपयांसह सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.
पुस्तकला पंधरे यांचे पती एक वर्षापूर्वी मरण पावले असून त्या आपल्या दोन मुले व आंधळ््या-बहºया सासू रायाबाई यांच्यासोबत राहतात. मोलमजुरी करून त्या कुटुंबाचा गाडा खेचत आहेत. मनरेगाच्या कामावर आपल्या मुलासह गेल्या असता त्यांच्या घराला आग लागली. गावातील युवक व पुस्तकलाबाई घरी पोहचतपर्यंत त्यांच्या घरातील सर्वच काही जळून खाक झाले होते.
सासू रायाबाई घराच्या मागील भागात बसलेल्या होत्या व त्यांना कळलेच नाही. त्या घरातच असल्याचे कळताच गावातील संतोष तरोणे, सुरेश पंधरे, सचिन गजभिये, विजय बहेकार, राजेश मरकाम, राजेश पाऊलझगडे, सुखदेव पंधरे, मोरेश्वर मारवाडे यांनी त्यांना बाहेर काढले. आगीवर नियंत्रण मिळवत पर्यंत घरातील भांडीही वितळली होती.
पुस्तकलाबाई सकाळी पुजा करून अंगरबत्ती लावून थोरला मुलगा मोहन यांच्यासोबत कामावर गेल्या होत्या. तर धाकटा कचारगड यात्रेत गेला होता. सासू रायाबाई घरी एकट्याच होत्या. अशात आग अगरवबत्तीने किंवा शॉटसर्कीटने लागली कळू शकले नाही. कारण या आगीत घरातील सर्व विद्युत उपकरणही भस्मसात झाले आहेत. तलाठी बी.डी.वरक डे यांनी पंचनामा केला.
बचतगटाचे साहित्यही जळून खाक
पुस्तकलाबाई महिला बचत गटाच्या गावच्या सीआरपी म्हणून काम करीत असून त्यांच्याकडे महिलांच्या ६० साड्या, आठ हजार रूपये रोख तसेच सर्व रेकॉर्ड होते. शिवाय पतीच्या तेरवीच्या कार्यक्रमात नातलगांनी दिलेल्या ५० साड्या व शर्ट-पँट पीस, घरात वापरायचे कपडे, धान्य सर्वच काही या आगीत भस्मसात झाले आहे. यामुळे आज पुस्तकलाबाईंच्या घरातील सदस्यांच्या अंगावर आहे तेच कपडे उरले आहेत.

पुस्तकलाबाईंच्या घराला आग लागून सर्वच भस्मसात झाले आहे. अशात घर चालविण्यासाठी गावकरी मिळून तात्पुरती मदत करतील. शिवाय शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाईल.
-परसराम फुंडे
सरपंच, ग्रामपंचायत गिरोला

Web Title: A fire in a widow's house in Girolah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग