पहिली ‘अटल टिंकरिंग लॅब’ तिरखेडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 09:25 PM2018-07-30T21:25:48+5:302018-07-30T21:26:39+5:30
सालेकसा : शहरीभागासह ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील संशोधक वृत्तीला वाव मिळावा, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी, यासाठी केंद्र शासनाने अटल टिंकरिंग लॅब योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यात सात लॅब मंजूर करण्यात आल्या आहे.
Next
ठळक मुद्देकेंद्र शासनाचा उपक्रम : मुलांमध्ये संशोधन वृत्ती वाढविण्याचा प्रयत्न
<p>लोकमत न्यूज नेटवर्केसालेकसा : शहरीभागासह ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील संशोधक वृत्तीला वाव मिळावा, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी, यासाठी केंद्र शासनाने अटल टिंकरिंग लॅब योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यात सात लॅब मंजूर करण्यात आल्या आहे. यातील पहिली ‘अटल टिंकरिंग लॅब’ तालुक्यातील तिरखेडी येथील ग्राम विकास विद्यालयात स्थापन करण्यात आली आहे. यामुळे आदिवासी व नक्षल प्रभावित भागातील विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
अटल टिंकरिंग लॅब योजना केंद्र शासनाच्या नीती आयोग पुरस्कृत असून देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रेरणेने सुरु करण्यात आली आहे. एकूण २० लाख रुपयांचा हा प्रोजेक्ट असून विविध प्रकारच्या यंत्राचे नमुने यात ठेवण्यात आले आहे. या लॅबमध्ये विविध प्रकारच्या यंत्राचे पार्ट्स व त्याचे नमूने ठेवले आहे. त्या पार्ट्सला एकमेकांशी जोडून यंत्र कसे तयार करायचे याचे मुलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू व संशोधक वृत्तीच्या मदतीने नवनवीन उपकरणे तयार करता येणार आहे.यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा याचे मार्गदर्शन लॅबच्या मदतीने करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्तीतून रोबोट, कॅम्प्युटर, रणगाडे, जहाज व इतर आधुनिक वाहने कशीे तयार करायची याचे धडे दिले या लॅबच्या माध्यमातून दिले जाणार आहे. थ्रीडी मशीनच्या माध्यमातून विविध चित्र, मुर्त्या तयार करणे आणि ७५० प्रकारच्या कलात्मक वस्तू स्कॅनरच्या मदतीने तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासासह कमीत कमी वेळात जास्तीत-जास्त वस्तंूची निर्मिती आणि दर्जेदार व आंतराष्ट्रीय गुणवत्तेच्या वस्तू तयार करण्याचे कौशल्य विकसीत करण्यात येणार आहे.
पाच वर्षाचे प्रशिक्षण
केंद्र शासनाच्या नीती आयोग पुरस्कृत या योजनेसाठी २० लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाच वर्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. केंद्राच्या विज्ञान व प्रौद्योगिकी तसेच मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने ही लॅब चालविण्यात येणार आहे. यासाठी महिन्यातून चार दिवस मुंबई येथील इंजिनिअर येवून प्रथम शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. तिरखेडी शाळेचे सहाय्यक शिक्षक जी.टी.भांडारकर यांना लॅब संयोजक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
लॅबचे उद्घाटन
तिरखेडी येथील अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन नुकतेच माजी अर्थमंत्री व माजी महादेवराव शिवणकर यांच्या अध्यक्षतेखाली माजी मंत्री भरतभाऊ बहेकार यांच्या हस्ते करण्यात आले. माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, जि.प.सदस्य देवराज वडगाये, जि.प.सदस्या दुर्गा तिराले, संत ज्ञानीदासजी महाराज, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबा कटरे, बबलू कटरे, तुकाराम बोहरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य पी.आर.पटेल यांनी मांडले. या वेळी तालुक्यातील शाळा महाविद्यालय आणि संस्थेचे मुख्याध्यापक शिक्षक व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन बी.के. कोरे यांनी केले तर आभार लॅब संयोजक जी.टी.भांडारकर यांनी मानले.