रोहयोच्या कामाला गावकऱ्यांची पहिली पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 08:49 PM2018-04-28T20:49:50+5:302018-04-28T20:49:50+5:30

येथील ग्रामपंचायतच्यावतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाला ५-६ दिवसांपासून सुरुवात झाली आहे. गावात सुरु होणाऱ्या रोहयो कामाला ग्रामस्थांची प्राधान्याने पसंती असल्याचे चित्र प्रत्यक्षात कामावर असलेल्या मजुरांच्या उपस्थितीवरुन दिसून येत आहे.

First choice for Roho's work | रोहयोच्या कामाला गावकऱ्यांची पहिली पसंती

रोहयोच्या कामाला गावकऱ्यांची पहिली पसंती

Next
ठळक मुद्देपाटचारी दुरुस्ती : सोईसुविधांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : येथील ग्रामपंचायतच्यावतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाला ५-६ दिवसांपासून सुरुवात झाली आहे. गावात सुरु होणाऱ्या रोहयो कामाला ग्रामस्थांची प्राधान्याने पसंती असल्याचे चित्र प्रत्यक्षात कामावर असलेल्या मजुरांच्या उपस्थितीवरुन दिसून येत आहे.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत गादबोडी पाटचारी दुरुस्तीच्या कामाला शुक्रवारी (दि.२७) सुरूवात करण्यात आली. सदर कामावर गावातील सामान्य कुटुंबांसह सधन कुटुंबातील महिला-पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. भर उन्हामध्ये मजूर रोजी-रोटीसाठी आपल्या जिवाचा आटापिटा करताना दिसत होते.
रोहयोच्या कामावर दगदग नाही म्हणून जे लोक मजुरीसाठी घराच्या बाहेर निघत नाही, अशा कुटुंबातील सदस्य सुध्दा कामावर मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याचे चित्र होते. मनरेगामुळे मजुरांच्या हाताला कामे उपलब्ध झाली आहे.
मंडपाची सोय नाही
ज्या परिसरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम सुरु आहे. त्या ठिकाणी आवश्यक सुविधांचा पुरवठा करणे आवश्यक असते. रोहयोचे काम सुरु असलेल्या ठिकाणी मजुरांना थोडा वेळ विश्रांतीसाठी वा उन्हापासून बचाव होण्यासाठी मंडपाची कोणतीच सोय केलेली दिसून आली नाही. झाडाच्या खाली मजूर बसलेले दिसत होते.
मॅटीन चोरीला गेली
काम करताना मजुरांना थोडा विसावा वाटावा म्हणून हिरव्या मॅटीनचा मंडप लावला नाही असे विचारताच ग्राम रोजगार सेवक नाकाडे यांनी, दुसºया बाजूला तीन-चार पाटचारी दुरुस्तीचे काम केले. तिथे मॅटीनचा मंडप करण्यात आला होता. काम संपताच कोणीतरी ती मॅटीन चोरुन नेल्याचे त्यांनी सांगितले. कामावरुन मॅटीन चोरी गेल्याचा प्रकार कसा घडला हे एक कोडेच म्हणावे लागेल.

Web Title: First choice for Roho's work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.