महिला सक्षमीकरणासाठी सर्वप्रथम काँग्रेसचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 08:49 PM2019-07-04T20:49:33+5:302019-07-04T20:49:50+5:30
काँग्रेसने स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून महिलांना सक्रीय राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान दिले. काँग्रेस पक्षाने महिलांसाठी ५० टक्के आरक्षण घोषित करून समानतेचा अधिकार व अनेक योजनांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाला मजबूत करण्याचे कार्य केले आहे. असे मत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : काँग्रेसने स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून महिलांना सक्रीय राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान दिले. काँग्रेस पक्षाने महिलांसाठी ५० टक्के आरक्षण घोषित करून समानतेचा अधिकार व अनेक योजनांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाला मजबूत करण्याचे कार्य केले आहे. असे मत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केले.
शहर महिला काँगे्रस कमेटीच्या वतीने मंगळवारी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, शहरध्यक्ष अशोक चौधरी, जि.प.सभापती लता दोनोडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, चेतना पराते, मोसमी भालाधरे, माजी शहर महिला काँग्रेसध्यक्ष निलू मांढरे, आशा जैन उपस्थित होते. आ. अग्रवाल म्हणाले, गोंदिया शहरात महिलांच्या विकासासाठी अनेक योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात शहरात महिला वर्गासाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतील.महिलांचे सबलीकरण हेच काँग्रेसचे मुख्य ध्येय असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा मार्गदर्शन केले. या वेळी आ.गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून अनेक महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काजल अग्रवाल, सारीका बरईकर, सुधा पाठक, योगीता धांडे, स्मिता सोनवाने, निधी गुप्ता, स्नेहा गुप्ता, स्मिता सहारे, स्मिता वाढई, शिवानी सिंग, शिप्रा राठोड, आशा बोरकर, जोत्स्ना भौतिक, लालन नागदवने,नफिसा शेख, वैशाली उंदीरवाडे, सालेह शेख, मिरा भालाधरे, गिता मेश्राम, वंदना लोणारे, रेखा निमकर, रेखा लालवानी, सुनिता उके, अनिता वाहाने, छाया बुलबुले, मिना चंदेले, सकुन बहाने, वसुधा शहारे, ममता सोनवाने,योगता वाघमारे, प्रमिला दामले, माधुरी चंद्रिकापुरे, बबीता वाघमारे, शांता दोनोडे, वर्षा नागेश्वर, साहिन कुरैशी, कनिजा शेख, लक्ष्मी धरमगडीया, शिला खैरकर, ज्योती कोशर, वर्षा सोनवाने, तिजू ठाकरे, ज्योती लिल्हारे, रविकांत सहारे, गिता जैवार, सीमा नागपुरे, यमुना कामडे, गिता वालोकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.