यंदाही शाळेचा पहिला दिवस गणवेशाविनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 09:31 PM2019-06-15T21:31:21+5:302019-06-15T21:31:51+5:30
शासनातर्फे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क गणवेशाचे वाटप केले जाते. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी गणवेशातच यायला हवे असे असतांना शाळा सुरू होण्यास दहा दिवसाचा कालावधी शिल्लक असून ३ कोटी ५१ लाख रूपये गणवेशासाठी मिळाला नाही.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनातर्फे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क गणवेशाचे वाटप केले जाते. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी गणवेशातच यायला हवे असे असतांना शाळा सुरू होण्यास दहा दिवसाचा कालावधी शिल्लक असून ३ कोटी ५१ लाख रूपये गणवेशासाठी मिळाला नाही. हा निधी न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेशात शाळेत जाता येणार नाही.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शासनातर्फे दोन जोडी गणवेश दिले जाते. त्या गणवेशासाठी ४०० रूपये दिले जायचे. गणवेशाच्या निधीत मागच्या वर्षीपासून २०० रूपयांनी वाढ करण्यात आली. गणवेशाची रक्कम डीबीटीमार्फत जमा करण्यात आल्यामुळे शून्य शिल्लकेवर खाते उघडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यातील गणवेशाची रक्कम बँकांनी कमीत कमी बॅलेंंन्स नसल्याचे कारण दर्शवून लाखो रूपये कपात केले. त्यामुळे डीबीटीच्या नादात हजारो विद्यार्थी गणवेशाविना राहीले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेत शिक्षण घेणाºया इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व मुली, अनुसूचित जातीचे मुले, अनुसूचित जमातीची मुले व दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जाते. प्रती गणवेश खरेदीसाठी ३०० रुपये असे एकूण दोन गणवेशासाठी ६०० रुपये शाळा व्यवस्थापन समितीला आता दिले जाणार आहेत.गोंदिया जिल्ह्यातील ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना गणवेशासाठी ४ कोटी ५१ लाख ६५ हजार ६०० रूपये लागणार आहेत. यापैकी गणवेशाचे १ कोटी रूपये गोंदियाच्या समग्र शिक्षा अभियानाकडे आहेत. उर्वरीत ३ कोटी ५१ लाखाची मागणी करण्यात आली आहे. परंतु आतापर्यंत गणवेशाची रक्कम महाराष्टÑ प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईकडून अद्याप मिळालेली नाही. २६ जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजणार आहे.पहिल्या दिवशी गणवेश मिळणे आवश्यक असतांना निधी न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा पहिला दिवस गणवेशाविना जाणार नाही.
गणवेशाचा हिशेब व्यवस्थापन समितीकडेच
शासनातर्फे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप केले जाते. मात्र मागील वर्षीपासून शासनाने गणवेशाचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात (डीबीटी) जमा करण्याचा निर्णय घेतला होता.त्यामुळे अर्धे सत्र लोटूनही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नव्हते.परंतु त्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाही ही बाब लक्षात आल्यावर आता गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात टाकली जाणार आहे.