उत्तम आरोग्य सेवा पोहोचविणे शासनाचे प्रथम कर्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2017 01:07 AM2017-06-27T01:07:13+5:302017-06-27T01:07:13+5:30
आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा आहे. समाजातील प्रत्येक नागरिकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहचविणे हे प्रगतीशील शासनाचे प्रथम कर्तव्य आहे.
गोपालदास अग्रवाल : कामठा येथील आरोग्य शिबिर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा आहे. समाजातील प्रत्येक नागरिकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहचविणे हे प्रगतीशील शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. कॉंग्रेस शासनाच्या कार्यकाळात आम्ही तालुक्यात प्रत्येक गावात आरोग्य सेवा पोहचविण्याचे प्रयत्न केले व त्यात आम्हाला यशही लाभले. मात्र सर्वात मोठी उपलब्धी शासकीय मेडीकल कॉलेज असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम कामठा येथे आयोजीत आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे होते.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, सरपंच कल्पना खरकाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे, पंचायत समिती उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, जि.प.सदस्य विजय लोणारे, प्रकाश डहाट, चमन बिसेन, सावलराम महारवाडे, संतोष घरसेले, सत्यम बहेकार, हुकूम नागपूरे, टिकाराम भाजीपाले, दिनेश अग्रवाल, संजय अग्रवाल, भूवन सोलंकी, राजेंद्र आसोले, राधेशाम पाटील, रूपचंद मलगाम, छुन्नू खरकाटे, गिरधारी बघेले, डॉ.गिऱ्हेपूंजे, डेलीराम हुमणे, नारायण जगणे, मारोती दरोई, तावाडे, केशव तावाडे व अन्य उपस्थित होते.