आधी आरोग्यसेवा नंतर कुटुंबसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:28 AM2021-05-16T04:28:01+5:302021-05-16T04:28:01+5:30

बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील चान्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. श्वेता कुलकर्णी कार्यरत आहेत. एकत्रित असलेल्या ...

First health care then family service | आधी आरोग्यसेवा नंतर कुटुंबसेवा

आधी आरोग्यसेवा नंतर कुटुंबसेवा

Next

बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील चान्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. श्वेता कुलकर्णी कार्यरत आहेत. एकत्रित असलेल्या कुटुंबाची पूर्णत: जवाबदारी पेलवून कोरोनाच्या महामारीत आपल्या कर्तव्याला गालबोट लागू न देता रुग्णसेवेला प्राथमिकता देऊन कोरोनाच्या संसर्गाला थोपविण्यासाठी सदैव प्रयत्नरत आहेत. ग्रामीण भागातील जनतेला प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी त्या सदैव प्रवृत्त करतात.

प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २३ गावांचा समावेश आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी ८ कर्मचारी कमी असतानासुद्धा आपल्या कर्तव्यात कोणती कमतरता जाणवू दिली नाही. कोरोना चाचण्या नियमित होण्यासाठी आपल्या आरोग्य पथकाच्या सहकार्याने सतत प्रयत्नरत आहे. कोरोना महामारीच्या पहिल्याच टप्प्यात डाॅ. कुलकर्णी कोरोनाबाधित झाल्या होत्या. आपल्या एकुलत्या एक ३ वर्षांच्या बाळाचे संगोपन करूनसुद्धा त्यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडू दिला नाही. तालुक्यात पहिल्या प्रथमच जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात कोविशिल्ड या प्रतिबंधात्मक कोरोना लसीचा पहिला व दुसरा डोस सर्वप्रथम घेऊन तालुक्यातील समस्त जनतेला लसीकरणाबाबत प्रवृत्त केले. ग्रामस्थांशी जवळीक साधून कोरोना चाचणी तसेच लसीकरण घेण्यासाठी रणरागिनीसारख्या डॉ. श्वेता कुलकर्णी कार्य करताना दिसतात. तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता लसीकरण गरजेचे असल्याचे ते सांगतात. लहान मुलांना लसीकरण नसल्याने पालकांनी सावध राहून काळजी घेणे गरजेचे आहे. सतत संपर्कात राहून सर्वसामान्यांची काळजी घेणे, हेच आपले परमकर्तव्य असल्याचे त्या आवर्जून सांगतात.

.....

कुटुंबीय रुग्णालयात तरी सेवेत खंड पडू दिला नाही

डॉ. कुलकर्णी यांच्या परिवारातील ५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या सासूबाई कुंदा डोंगरवार या झरपडा गावच्या सरपंच आहेत. त्यासुद्धा कोरोनाबाधित होत्या. गृह विलगीकरणात होत्या. शुक्रवार (दि.१४) त्यांनी कोरोनावर मात करून कुटुंबात परतल्या. त्यांचे वडील प्रवीण कुलकर्णी कोरोनाबाधित असून कोविड केंद्रामध्ये भरती आहेत. परिवारातील मंडळी कोरोनाबाधित असतानासुद्धा कर्तव्य हेच जीवन समजून त्या रजेवर सुद्धा गेल्या नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावांना भेटी देऊन आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य ढळू देत नाही.

बॉक्स

लसीकरण व चाचणीवर भर

वरिष्ठांकडून लस व चाचणी किट उपलब्ध होताच पीएचसीच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये कोरोना चाचणी वेळोवेळी केली जाते. गावामध्ये मुनारी देऊन लस देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. समाज माध्यमांवरील अफवा कानी, मनी न घेता प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी पुढे यावे. लसीकरणाचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत.

Web Title: First health care then family service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.