जिल्ह्यात प्रथमच ‘लाखात एक’ अभियान
By Admin | Published: December 28, 2015 02:03 AM2015-12-28T02:03:42+5:302015-12-28T02:03:42+5:30
गोंदिया जिल्ह्यात प्रथमच एज्युकेशन फाऊंडेशन फॉर लिटरसी अॅन्ड एज्युकेशन ट्रेनिंग मुंबईच्या माध्यमातून ‘लाखात एक’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
चिचटोला : गोंदिया जिल्ह्यात प्रथमच एज्युकेशन फाऊंडेशन फॉर लिटरसी अॅन्ड एज्युकेशन ट्रेनिंग मुंबईच्या माध्यमातून ‘लाखात एक’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
हे अभियान एक राष्ट्रव्यापी चळवळ असून यात मुलांची शैक्षणिक क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. याचे उद्दिष्ट देशातील एक लाख गावात व वस्त्यांपर्यंत पोहचविणे आहे. पालकांना सांगण्यात येते की त्यांनी आपल्या गावात मुलांकडे लक्ष द्यावे. शालेय मुले किती चांगल्याप्रकारे वाचू शकतात आणि चांगल्याप्रकारे गणिती क्रिया करू शकतात.
देशात शाळेत जाणाऱ्या जवळजवळ सर्व मुलांची शाळेत पटनोंदणी झाली आहे. परंतु असरच्या अॅन्युअल स्टेटस आॅफ एज्युकेशन रिपोर्टप्रमाणे, १० वर्षांच्या आकडेवारीनुसार देशात शैक्षणिक संकट असल्याचे दिसते. इयत्ता पाचवीच्या ५० टक्केपेक्षा विद्यार्थी इयत्ता दुसरीच्या स्तराचा पाठ सहजपणे वाचू शकतात. इयत्ता पाचवीच्या तीन मुलांपैकी एकच मुलगा भागाकाराचे गणित सोडवू शकतो. इतर उपलब्ध आकडेवारीतसुध्दा उत्तम पटनोंदणी आणि खालविलेला शैक्षणिक स्तर दाखवतो.
प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनने अशी पध्दत विकसित केली आहे. त्यामुळे सामान्य लोकसुध्दा शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकतील. मुले जर शिकत नसतील तर ‘प्रथम’ने अशा समस्या सोडविण्यासाठी कमी वेळात कमी पैशात शिक्षणाच्या विकास करणारी पद्धत सुरू केली आहे. (वार्ताहर)