प्रथमच गोंदिया आगार १.७७ कोटीच्या नफ्यात

By Admin | Published: June 8, 2016 01:28 AM2016-06-08T01:28:21+5:302016-06-08T01:28:21+5:30

सुरक्षित प्रवासाचे ब्रीद घेऊन धावणारी रा.प.महामंडळाची बससेवा नेहमीच तोट्यात जाते, अशा बोंबा होतात. मागील

For the first time, the profit of Gondia Depot 1.77 crores | प्रथमच गोंदिया आगार १.७७ कोटीच्या नफ्यात

प्रथमच गोंदिया आगार १.७७ कोटीच्या नफ्यात

googlenewsNext

गोंदिया : सुरक्षित प्रवासाचे ब्रीद घेऊन धावणारी रा.प.महामंडळाची बससेवा नेहमीच तोट्यात जाते, अशा बोंबा होतात. मागील पाच-सहा वर्षांपासून एसटीचे गोंदिया आगारही तोट्यातच जात होते. मात्र यंदा प्रथमच सन २०१५-१६ मध्ये गोंदिया आगार तब्बल एक कोटी ७७ लाख ६२ हजार रूपयांच्या नफ्यात आले आहे. यामुळे गोंदिया स्थानकावर विविध सुविधाही मिळाल्या आहेत.
गोंदिया आगाराला सन २०११-१२ या आर्थिक वर्षात ४२ लाख ४२ हजार रूपयांचा तोटा झाला होता. तर सन २०१२-१३ मध्ये तीन कोटी सात लाख १७ हजार रूपयांचा तोटा, सन २०१३-१४ मध्ये दोन कोटी ८२ लाख ४९ हजार रूपयांचा तोटा व सन २०१४-१५ मध्ये एक कोटी ७४ लाख ६९ हजार रूपयांचा तोटा गोंदिया आगाराला सहन करावा लागला. मात्र हा आलेख पाहता मागील चार वर्षांपासून गोंदिया आगाराचा तोटा कमीकमी होत गेल्याचे दिसून येते. मागील अनेक वर्षांपासून सतत तोट्यात जाणाऱ्या गोंदिया आगाराने प्रथमच सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात तब्बल एक कोटी ७७ लाख ६२ हजार रूपयांचा नफा मिळविला आहे.
मागील अनेक वर्षांपासून गोंदिया आगाराचा तोटा कमीकमी होत जावून यावर्षी नफ्यात आले असताना राज्य परिवहन महामंडळाने तडकाफडकी आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांची बदली केली.
गोंदियात साडे तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याचे सांगून त्यांची बदली गडचिरोली येथे सहायक वाहतूक अधीक्षक या पदावर करण्यात आली. परंतु गोंदिया आगारात असे अनेक कर्मचारी आहेत, ज्यांना सेवेच्या चारपेक्षा अधिक वर्षांचा कार्यकाळ लोटला, मात्र बदली करण्यात आली नाही.
आगार व्यवस्थापक शेंडे यांच्या कार्यकाळात गोंदिया आगारात जवळपास एक कोटींची विकास कामे करण्यात आलीत. यातील काही कामे पूर्ण झाली तर काही सुरू आहेत. गोंदिया बस स्थानकावर प्रवाशांच्या मनोरंजनासाठी टीव्हीची सोय करण्यात आली.
प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रस्ताव पाठविण्यात आला. बस स्थानकात दोन्ही बाजूने फलाटांची सोय करण्यात आली. २० लाखांच्या खर्चातून स्थानक व आगाराचे संपूर्ण विद्युतीकरण करण्यात येणार आहे.
येत्या काही दिवसांत त्याचे काम सुरू होणार असून भंडारा व नागपूर विभागातून संपूर्ण इलेक्ट्रीफिकेशन असलेले गोंदिया आगार हे एकमेव राहणार आहे. तसेच २० लाखांच्या खर्चातून स्थानक परिसरात खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

गोंदियात येण्यास अनेक अधिकाऱ्यांचा नकार?
४आगार व्यवस्थापक म्हणून गोंदियात रूजू होण्यास अनेक अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. नागपूर येथील अशोक तरोडे यांची बदली गोंदियात आगार व्यवस्थापकपदी करण्यात आली. मात्र त्यांनीही नकार दिला. त्यांना आगार व्यवस्थापकांचे पद हवे नसल्यामुळे त्यांची पुन्हा बदली वर्धा येथे बस स्थानक प्रमुख या पदावर करण्यात आली. त्यामुळे गोंदिया आगार व्यवस्थापक पदाचा पदभार सहायक वाहतूक अधीक्षक संजना पटले यांच्याकडे देण्यात आला. मात्र त्यांनीही नकारच दिल्याचे सांगण्यात आले.
भंडारा विभागात अनेक पदे रिक्त
४जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा या आगारांमध्ये नियमित आगार व्यवस्थापक नाहीत. तसेच भंडारा विभागीय मुख्यालय, पवनी व साकोली या आगारांमध्ये नियमित आगार व्यवस्थापक नाहीत. भंडारा विभागात विभाग नियंत्रक, यंत्र अभियंता (चालन), उपयंत्र अभियंता, सहायक यंत्र अभियंता ही पदे रिक्त आहेत. विभागीय लेखाधिकारी, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी, विभागीय अभियंता (स्थापत्य), सुरक्षा व दक्षता अधिकारी पदाचा पदभार कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आला आहे.

Web Title: For the first time, the profit of Gondia Depot 1.77 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.