दुर्गम भागातील पहिली महिला एसडीओ भावना माहुले ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:27 AM2021-03-08T04:27:51+5:302021-03-08T04:27:51+5:30

विजय मानकर सालेकसा : दृढ निश्चय, उच्च विचार आणि कठोर परिश्रम या तीन गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित केले तर ...

First woman SDO Bhavana Mahule in remote areas () | दुर्गम भागातील पहिली महिला एसडीओ भावना माहुले ()

दुर्गम भागातील पहिली महिला एसडीओ भावना माहुले ()

Next

विजय मानकर

सालेकसा : दृढ निश्चय, उच्च विचार आणि कठोर परिश्रम या तीन गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित केले तर यश नक्कीच मिळते असे म्हटले जाते. हाच मूलमंत्र जपत यशाचे शिखर गाठण्याचे कार्य सालेकसा तालुक्यातील दुर्गम गावातील एका तरुणीने केले. तिच्या या यशाने केवळ तिचे कुटुंब, गाव नव्हे तर संपूर्ण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सालेकसा तालुक्यातील मोकाशीटोला (कोटजमुरा) या अतिदुर्गम छोट्याशा गावची कन्या भावना मेघनाथ माहुले हिने स्पर्धा परीक्षेत यश संपादन करुन उपविभागीय अधिकारी झाली आहे. ती सध्या ओडिशा राज्यात भुवनेश्वर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणारी ती तालुक्यातील पहिली तरुणी आहे. सालेकसा तालुक्याचे नाव घेताच प्रत्येकाच्या मनात एकच विचार येतो तो म्हणजे अतिदुर्गम मागासलेला नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील तालुका. या तालुक्यात ८० टक्के गावे अशी आहेत की त्या गावांपर्यंत परिवहन व्यवस्था, संपर्काची साधने, उच्च शिक्षण व इतर सोयी सुविधा आजही कोसो दूरच आहेत. पंरतु, बुद्धिमत्ता निसर्ग प्रदत्त गुण असून ती कोणाच्याही अंगी असू शकते आणि तिचे सार्थक केले जाऊ शकते हे भावना माहुले हिने सिध्द करुन दाखविले आहे.

सालेकसा तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेले महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवरील गाव मोकाशीटोला (कोटजमुरा) फक्त ३०-३५ कौलारू घरांच्या या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे केवळ खरीप हंगामात धानाची शेती, याशिवाय वर्षभर अनेक लोक मोलमजुरी करतात. या गावची सर्व मुले गावच्या जि.प. शाळेतच शिक्षण घेतात. याच गावातील शेतकरी कुटुबात जन्मलेले मेघनाथ माहुले यांनी गावच्या शाळेतच शिक्षण घेऊन पुढे प्राथमिक शाळेचे शिक्षक झाले. नंतर त्यांनी आपल्या मुलीला सुध्दा गावातीलच जिल्हा परिषद शाळेतच शिकविले. मुलगी भावना माहुलेच्या अंगी जिद्द व चिकाटी असल्यामुळे तिने नेहमी आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित केले. १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर इंजिनिअरच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. ती सिव्हील इंजिनियरिंगमध्ये महाविद्यालयातून टॉपर आली. २०१९ केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत महानिदेशक पदासाठी लेखी व मौखिक परीक्षा उत्तीर्ण केली. त्यात तिला नोकरीची संधी मिळाली परंतु हजारो किमी दूर अंतरावर मिळालेली नोकरी पत्करावी की नाही असे वाटत असताना शेवटी नोकरीवर रुजू झाली. ती आता ओडिशा राज्यात भुवनेश्वर येेथे उपविभागीय अधिकारी श्रेणी-१ या पदावर कार्यरत आहे.

.......

ग्रामीण भागातील मुलींसाठी ठरत आहे प्रेरणा देणारी

२०२० मध्ये ती पहिली एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणारी तालुक्यातील पहिली तरुणी ठरली. पुन्हा तिला दुसऱ्या नोकरीची संधी लाभली परंतु तिने पहिली नोकरी सोडली नाही. आजही सतत आपल्या कर्तव्यावर सेवारत असताना संघ लोकसेवा आयोगाचा अभ्याससुध्दा करीत आहे. गावच्या मातीत खेळणारी, कुटुंबासह शेतात जाणारी व शेतीचे कामे करणारी आणि गावच्या जि.प.शाळेत शिकणारी भावना माहुले आज तालुक्यातील इतर मुलींसाठी प्रेरणा देणारी ठरली आहे. आपल्यातील जिद्द व चिकाटीने परिश्रम करुन यशाचे शिखर गाठणाऱ्या भावना माहुले हिला आज ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सलाम.

......

लोकसेवेतून देशसेवेला समर्पित

शासकीय नोकरीत एक प्रशासकीय अधिकारी म्हणून लोकसेवा करण्याची संधी मिळाली आली. या लोकसेवेतून देशसेवा करण्यासाठी आपण आपले आयुष्य समर्पित करुन देशाच्या प्रगतीसाठी थोडासा हातभार लावण्याचा प्रयत्न सदैव करीत राहणार असे मत भावना माहुुले हिने लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

Web Title: First woman SDO Bhavana Mahule in remote areas ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.