बारदान्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:45 AM2018-11-28T00:45:06+5:302018-11-28T00:45:54+5:30

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी शासनाची एजन्सी म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ शासकीय धान खरेदी सुरू करुन धान खरेदी करते.

Fiscal exploitation of farmers due to barbeconds failed | बारदान्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक

बारदान्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक

Next
ठळक मुद्देशासकीय धान खरेदी : आदिवासी विकास महामंडळ, पंधरा रुपयांचा बारदाना २५ रुपयाला

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी शासनाची एजन्सी म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ शासकीय धान खरेदी सुरू करुन धान खरेदी करते. मात्र तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे चित्र आहे.
यावर्षी धानाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मागील दोन तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शेतकरी मोठ्या आशेने धानाची मळणी करुन त्याची विक्री करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर नेत आहेत. मात्र या केंद्रावर बारदाना उपलब्ध नसल्याने शेतकºयांना धानाची विक्री करण्यास अडचण जात आहे. गरजेपोटी शेतकरी धान खरेदी केंद्राबाहेरच खासगी व्यापाºयांना कमी दराने धानाची विक्री करीत आहे.
त्यामुळे शेतकºयांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सडक-अर्जुनी तालुक्यात आदिवासी विकास महामंडळाचे एकूण दहा शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु आहे.
सडक-अर्जुनी तालुक्यात आतापर्यंत ३० हजार क्विंटल धान खरेदी झाली आहे.धान खरेदी केंद्रामध्ये सडक-अर्जुनी, चिखली, कनेरी, परसोडी, खजरी, डव्वा, दल्ली, डोंगरगाव, कोयलारी, कोहमारा अशा केंद्राचा समावेश आहे.
आदिवासी विकास महामंडळाने बारदाना उपलब्ध नसल्यामुळे आणि बारदान्याची टंचाई आहे. व्यापारी नेमक्या याच संधीचा फायदा घेवून १० ते १५ रुपये किंमत असलेला बारदाना २५ रुपये किमतीत विकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. याकडेआदिवासी विकास महामंडळाने लक्ष देण्याची गरज आहे.

२२ नोव्हेंबरला बारदाना खरेदीची निविदा उघडण्यात आली असून ८ ते १० दिवसात बारदाना उपलब्ध होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
-सुरेश आंबडकर, प्रादेशिक व्यवस्थापक

आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्रीस आणणाºया शेतकºयांना लवकरात लवकर बारदाना उपलब्ध करुन देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे.
- राहुल पाटील, उपव्यवस्थापक नवेगावबांध.

Web Title: Fiscal exploitation of farmers due to barbeconds failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार