विद्यार्थ्यांनी पाहिला फिट इंडिया मुमेंट कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:52 PM2019-08-30T23:52:26+5:302019-08-30T23:53:15+5:30
जिल्ह्यातील आठही तालुक्यात‘फिट इंडिया मुमेंट’कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला.देशातील तमाम जनतेला व विशेष करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईव्ह डी.डी.नॅशनल, डी.डी.इंडिया व डी.डी.न्यूज या तीन चॅलनच्या माध्यमातून लाईव्ह मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देशाची सुदृढ पिढी निर्माण करण्यावर भर देण्यासाठी पंतप्रधानांनी ‘फिट इंडिया मुमेंट’कार्यक्रम आयोजित केला.यासंदर्भात २९ आॅगस्ट रोजी सकाळी १० ते ११ वाजता दरम्यान एक तास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह दाखविण्यात आला.जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १०६४ शाळांमधील २ लाख ४४ हजार विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम पाहिला.
जिल्ह्यातील आठही तालुक्यात‘फिट इंडिया मुमेंट’कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला.देशातील तमाम जनतेला व विशेष करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईव्ह डी.डी.नॅशनल, डी.डी.इंडिया व डी.डी.न्यूज या तीन चॅलनच्या माध्यमातून लाईव्ह मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत स्क्रीनवर हे मार्गदर्शन कार्यक्रम दाखविण्याची सोय करून देण्यात आली होती. यासाठी शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी एक दिवसापूर्वी सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हा कार्यक्रम प्रत्येक शाळेत राबविण्यात आला.२ लाख ४४ हजार ३७० विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम पाहिला. यात २८ हजार विद्यार्थी खासगी शाळांतील होते. आमगाव तालुक्यातील २१ हजार ८५ विद्यार्थी, सडक-अर्जुनी तालुक्यातील १८ हजार ८३३ विद्यार्थी, तिरोडा तालुक्यातील २८ हजार ७९५ विद्यार्थी,देवरी तालुक्यातील १८ हजार २०२ विद्यार्थी,अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २९ हजार ९४१ विद्यार्थी,सालेकसा तालुक्यातील १३ हजार ८३१ विद्यार्थी,गोरेगाव तालुक्यातील २१ हजार ४०६ विद्यार्थी, गोंदिया तालुक्यातील ६४ हजार २७७ विद्यार्थी व २८ हजार विद्यार्थी खासगी शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
सुदृढ शरीर यष्टीसाठी प्रयत्न
पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या या कार्यक्रमामुळे क्रीडा क्षेत्राला अधिक महत्त्व येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सुदृढ शरीर यष्टीसाठी मुख्याध्यापक व शिक्षकांकडून प्रयत्न केले जाणार आहेत.त्यासाठी आहार, विहार, दिनचर्या कशी असावी यावर शाळेचे मुख्याध्यापक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
डिजिटल शाळांचा झाला फायदा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘फिट इंडिया मुमेंट’कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखविण्यासाठी टीव्ही, लॅपटॉप, डोंगल, प्रोजेक्टरच्या मदतीने हा कार्यक्रम दाखवायचा होता. यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. जर हे उपलब्ध नसतील तर शाळेच्या शेजारच्या घरी टीव्ही असल्यास त्या घरी हे कार्यक्रम दाखवावे हे देखील म्हटले होते. परंतु गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल असल्यामुळे हा कार्यक्रम शाळेतच दाखविणे सोईस्कर झाले.