भुरले गोळीबार प्रकरणात पाच जणांना अटक, प्लॉट खरेदीवरून चालविली होती गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2022 01:06 PM2022-02-01T13:06:01+5:302022-02-01T13:08:40+5:30

टेमनी येथील शेतात भुरले यांचे अनाथाश्रमचे बांधकाम सुरू असून, २८ जानेवारीला ते पाहणी करण्यासाठी ते गेले होते. तेथून परत येत असताना दुचाकीवर स्वार दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्यावर गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले होते.

Five arrested in Bhurale bullet firing case | भुरले गोळीबार प्रकरणात पाच जणांना अटक, प्लॉट खरेदीवरून चालविली होती गोळी

भुरले गोळीबार प्रकरणात पाच जणांना अटक, प्लॉट खरेदीवरून चालविली होती गोळी

Next
ठळक मुद्देठार करण्याचा केला प्रयत्न

गोंदिया : शहरातील नेहरू वॉर्डातील रहिवासी धनेंद्र शिवराम भुरले (५२) यांच्यावर शुक्रवारी (२८ जानेवारी) सायंकाळी ५.३० वाजता गोळी चालवून त्यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात रामनगर पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली असून अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता पाच झाली आहे.

धनेंद्र भुरले हे टेमणी येथील शेतात अनाथालयाचे बांधकाम पाहून परत येत असताना टेमणी ते कटंगी मार्गावरील महाराजा ढाब्याजवळ मोटारसायकलवर मागे बसलेल्या इसमाने त्यांना ठार करण्याच्या उद्देशाने गोळी झाडली होती. गोळी भुरले यांच्या उजव्या गालात शिरली होती व भुरले यांनी जखमी अवस्थेत शहर पोलीस ठाणे गाठले होते. यावर पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी त्यांना लगेच औषधोपचारासाठी केटीएस शासकीय रुग्णालयात नेले होते, तर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी घटनास्थळाला भेट दिली होती.

या घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०७, १२०(ब), सहकलम ३,२५,२७ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद केला आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य बघता पोलीस अधीक्षक पानसरे यांनी स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया शहर व रामनगर पोलिसांना आरोपींना तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया शहर व रामनगर पोलिसांनी तपास पथक तयार करून चक्रे फिरवीत आरोपी उदय गोपलानी व गणेश जाधव यांना अटक केली. तर त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने उदय गोपलानीकडे जमीन विक्रीच्या व्यवसायात मदत करणाऱ्या निरज गुरलदास वाधवानी (४६, रा. माताटोली, बाराखोली), नरेश नारायण तरोणे (३५, रा. आरटीओ ऑफिसमागे, फुलचुर) व शिवशंकर भय्यालाल तरोणे (३३, रा. इर्री-नवरगाव) यांना अटक केली आहे. या आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक कठाळे, महेश बनसोडे, बबन आव्हाड, सहायक पोलीस निरीक्षक राहुल पाटील, तेजेन्द्र मेश्राम, जीवन पाटील, सहायक फौजदार गोपाल कापगते, पोलीस हवालदार राजू मिश्रा, पोलीस नायक महेश मेहर, तुलसीदास लुटे, पोलीस शिपाई विजय मानकर, संतोष केदार, दीक्षित दमाहे, धनंजय शेंडे, संजय मारवाडे, पोलीस नायक चौधरी, बिसेन, चव्हाण यांनी केली आहे.

Web Title: Five arrested in Bhurale bullet firing case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.