पाच दिवसीय शतकोत्तर जयंती महोत्सव

By admin | Published: April 9, 2016 02:06 AM2016-04-09T02:06:48+5:302016-04-09T02:06:48+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १० ते १४ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Five Day Century Birthday Jubilee Festival | पाच दिवसीय शतकोत्तर जयंती महोत्सव

पाच दिवसीय शतकोत्तर जयंती महोत्सव

Next

बाराभाटी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १० ते १४ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१० एप्रिलला सकाळी समता सैनिक दल व ग्रामस्थांची धम्मरॅली, त्यानंतर भीमबुद्ध गीतांचा कार्यक्रम होईल. उद्घाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते, साहित्यिक कविता कापगते यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यात वक्ते अ‍ॅड. भूपेंद्र रायपुरे, प्रा. जावेद पाशा, धम्मचारी अमृतसिद्धी मार्गदर्शन करतील. सायंकाळी ७.३० वाजता वामनदादा कर्डक आंबेडकरी जलसा चंद्रपूरद्वारे ‘आम्ही तुफानातले दिवे’ सादर करण्यात येईल. सुलभा खोब्रागडे, बाबुराव जुमनाके, सचिन फुलझेले सादर करणार आहेत.
११ एप्रिल रोजी मुक्तांगण युवामंचतर्फे सायंकाळी ६.३० वाजता युगपुरूष महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात येईल. यानंतर ७.३० वाजता भीमगीत समूहनृत्य स्पर्धा घेण्यात येईल. यात विजेत्यांना बक्षीस देण्यात येतील.
१२ एप्रिलला सायंक़ाळी ८.३० वाजता ‘स्वप्न भंगले सुखाचे’ हा तीन अंकी नाट्यप्रयोग तरूण मित्र मंडळ सादर करतील.
१३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता संपूर्ण ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येईल. त्यानंतर एस.एस. चव्हाण यांचा अंधश्रद्धेवर कार्यक्रम होईल. रात्री ८.३० वाजता प्रा. रेखाराम खोब्रागडे ‘युगपुरूष महात्मा ज्योतिबा फुले’ हा एकपात्री प्रयोग सादर करतील.
१४ एप्रिल रोजी सकाळी ध्वजारोहण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण व दीप प्रज्वलन, सायंकाळी ४ वाजता धम्मरॅली व विविध झाकी सादर करण्यात येतील.
सदर पाच दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन नवेगावबांध येथे अध्यक्ष भास्कर बडोले, उपाध्यक्ष के.आर. उके, सचिव डी.डी. भालाधरे, कोषाध्यक्ष के.ए. रंगारी, सहसचिव एन.के. उके व सल्लागार राजकुमार उंदिरवाडे यांनी केले आहे. (वार्ताहर )

Web Title: Five Day Century Birthday Jubilee Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.