चित्रफितीचा आधार घेत केले पाच पोलिसांना निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 05:00 AM2022-01-16T05:00:00+5:302022-01-16T05:00:17+5:30

७ मे २०२१ रोजी लॉकडाऊन काळात तालुक्यातील मुंडीपार येथे ठाणेदाराचे बीट अंमलदार प्रमोद सोनवणे आणि अनिल चक्रे यांनी अवैध दारू पकडून विशाल दसरिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई केली होती; परंतु या कारवाईविरोधात विशाल दसरिया यांनी चार पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार करताना पोलिसांनी त्यांना आठ पेट्या अवैध दारू पोलीस कर्मचारी मधू सोनी यांनी मित्र विशाल दसरियाला सुरक्षित ठेवण्यासाठी दिली होती. 

Five policemen were suspended based on the video | चित्रफितीचा आधार घेत केले पाच पोलिसांना निलंबित

चित्रफितीचा आधार घेत केले पाच पोलिसांना निलंबित

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा  :  सालेकसा पोलीस स्टेशनच्या पाच कर्मचाऱ्यांना अवैध दारू विक्री करणाऱ्यावर केलेली कारवाई खोटी असून, पोलिसांच्या विरोधात केलेल्या तक्रारीमुळे व दिलेल्या पुराव्याच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया यांनी तपासाअंती पाच पोलीस कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांसाठी निलंबित केले. त्यांना पोलीस स्टेशनमधून कार्यमुक्त करून पोलीस अधीक्षक कार्यालयात दर दोन दिवसांनी हजेरी लावण्याचा आदेश दिला. 
७ मे २०२१ रोजी लॉकडाऊन काळात तालुक्यातील मुंडीपार येथे ठाणेदाराचे बीट अंमलदार प्रमोद सोनवणे आणि अनिल चक्रे यांनी अवैध दारू पकडून विशाल दसरिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई केली होती; परंतु या कारवाईविरोधात विशाल दसरिया यांनी चार पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार करताना पोलिसांनी त्यांना आठ पेट्या अवैध दारू पोलीस कर्मचारी मधू सोनी यांनी मित्र विशाल दसरियाला सुरक्षित ठेवण्यासाठी दिली होती. 
काही दिवसांनंतर एका पोलीस कर्मचाऱ्याने विशाल दसरियाला फोन करून म्हटले की, आम्ही एका व्यक्तीला पाठवीत आहोत. त्याच्याकडे दोन पेट्या दारू द्या. विशाल दसरिया यांनी दोन पेट्या दारू देत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले आणि अवैध दारू विक्री करण्याचा गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई केली. त्यामुळे या कारवाईला विरोध करीत विशाल दसरिया यांनी संबंधित पोलिसांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार केली. तक्रारीची प्रत पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया, संबंधित आमदार, खासदार आणि गृहमंत्री महाराष्ट्र यांच्याकडेही केली. त्यांनी रेकॉर्ड केलेली चित्रफितीसुद्धा तपास करणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे सादर केली. चित्रफितीच्या आधारे पाच पोलिसांना पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया यांनी १४ जानेवारी रोजी निलंबनाचे आदेश दिले.

तक्रार चार पोलिसांची अन् निलंबित झाले पाच
- विशाल दसऱीया आणि भूषण मोहारे यांनी पोलिसांनी खोटी कारवाई केल्याबद्दल एकूण चार पोलिसांच्या विरोधात तक्रार केली होती. परंतु पोलीस अधीक्षक कार्यालयाने पाच पोलिसांना निलंबित केले आहे. याबद्दल अशी माहिती मिळाली की, अर्जदारांनी अशोक ढबाले, अनिल चक्री, प्रमोद सोनवाणे यांच्याविरोधात तक्रार केली होती. परंतु यापैकी कोणीतरी संतोष चुटे यांचे सुद्धा नाव या प्रकरणात समाविष्ट केले आणि एकूण पाच पोलिसांना निलंबित केले. 

तक्रार परत घेण्यासाठी केली होती पैशाची मागणी
- निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांशी ‘लोकमत’ प्रतिनिधींनी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, अर्जदाराने आधीच खोटे आरोप लावून गृहमंत्रालय आमदार, खासदार आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज करून निलंबन करण्याची मागणी केली होती. त्यानंतर निलंबन परत घेण्यासाठी संबंधित पोलिसांनाच ३० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला.

 खात्यावर जमा झालेल्या रकमेने केला घात 
- विशाल दसरिया आणि भूषण मोहाचे यांनी सहा महिन्यांनंतर पत्रकार परिषद घेऊन चार पोलिसांविरोधात आपली बाजू मांडली व तथाकथित खोटी कारवाईची चित्रफितीसुद्धा पत्रकार परिषदेत सादर केली. पोलीस अधीक्षक कार्यालयाने उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकूल यांना तपास करण्याचे निर्देश दिले. त्यांनी या प्रकरणाचा तपास करून तसा अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केला. पोलीस अधीक्षक कार्यालयाने चित्रफिती आणि पोलीस कर्मचारी मधू सोनी यांच्या खात्यावर वटवलेली रक्कम याचा आधार घेत पाच पोलिसांना निलंबित केले.

 

Web Title: Five policemen were suspended based on the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस