पाच रानडुकरांची शिकार

By admin | Published: November 25, 2015 05:31 AM2015-11-25T05:31:30+5:302015-11-25T05:31:30+5:30

तिरोडा तालुक्यातील चोरखमारा परिसरात रविवार (दि.२२) रात्री एका रानडुकराची हत्ता करण्यात आली. सोमवारी

Five Randers Hunting | पाच रानडुकरांची शिकार

पाच रानडुकरांची शिकार

Next

हत्येची कबुली : वीज तार काढताना केले ट्रॅप
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील चोरखमारा परिसरात रविवार (दि.२२) रात्री एका रानडुकराची हत्ता करण्यात आली. सोमवारी सकाळी पाच वाजता त्यातील आरोपीला वीज तार काढताना निसर्गप्रेमी सावन बहेकार यांनी पकडून वनविभागाच्या स्वाधीन केले. सदर आरोपीने आपण आपल्या सोबत्यांसह आतापर्यंत पाच रानडुकरांनी शिकार केल्याचा कबुली जबाब दिला आहे.
चोरखमारा परिसरात वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस विक्री होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्या आधारावर बहेकार यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाळत ठेवली. यात शिकार करणाऱ्या आरोपीला विद्युत तारांसह पकडून त्याला अटक करण्यात आली आहे. फागू हरिराम कुंभरे (४५) असे आरोपीचे नाव आहे.
सदर आरोपी चोरखमारा परिसरातील शेतशिवारात विद्युत तार लावून रानडुकरांची शिकार करतो. या प्रकरणाची माहिती वन विभागाला देण्यात आली होती. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून त्याला पकडले. त्याची चौकशी केली असता एका महिन्यात पाच रानडुकरांची शिकार करंट लावून केल्याचे त्याने आपल्या बयानात सांगितले. आरोपीवर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई उपवन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एन.एच. शेंडे, वाघाये, सावन बहेकार, वनपरिक्षेत्र अधिकारी एम.के. चाटी, एन.पी. वैद्य, के.जी. राणे, एस.डी. उईके, आय.आर. पठान यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

नऊ जणांचे बयान गुरूवारी

तिरोडा वनपरिक्षेत्र अधिकारी एम.के. चाटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फागू कुंभरे याने आपल्या कबुली जबाबात आपण आतापर्यंत करंट लावून पाच रानडुकरांची शिकार केल्याची माहिती सांगितली. तसेच या कटात आणखी आठ ते नऊ जण सहभागी आहेत. आरोपींनी त्यांची नावे सांगितली असून त्यांना बयानासाठी गुरूवानी बोलाविण्यात आले आहे. तसे नोटिसही त्यांना पाठविण्यात आल्याचे चाटी यांनी सांगितले.

वाघीण तीन छाव्यांसह बेपत्ता
जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातील एक वाघीण आपल्या तीन छाव्यांसह बेपत्ता झाली. याचा शोध वन विभाग, वन्यजीव विभाग व एफडीसीएमद्वारे करणे आवश्यक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागझिरा अभयारण्यात अल्फा टी-३ नामक एक वाघीण उन्हाळ्यात आपल्या तीन छाव्यांसह कोका रेंजमध्ये दिसून येत होती. ही वाघीण व छावे जून महिन्यातही दिसून येत होते. त्यानंतर कधीकधी ही वाघीण पावसाळ्याच्या दिवसांत दिसून आली होती. नागझिरा अभयारण्य पावसाळ्यानंतर उघडले जाते. तेव्हापासून आतापर्यंत कोणीही वनपर्यटक किंवा वन कर्मचाऱ्यांना अल्फा व तिचे तीन छावे दिसले नाही. मात्र तिच्या शोधाकडे दुर्लक्ष केले जात आहे. जर अल्फा आपल्या तिन्ही छाव्यांसह दुसऱ्या जंगल परिसरात गेली असेल तर इतर जंगल परिसरातील अधिकाऱ्यांशी संपर्क करून अल्पा व तिच्या तिन्ही छाव्यांचा शोध त्वरित सुरू करणे गरजेचे आहे. नागझिरा अभयारण्यात आधीच वाघांची कमतरता आहे. अशात एकही वाघ किंवा वाघीण दिसून येत नसेल तर त्यांचा शोध त्वरित घेणे गरजचे आहे, तेव्हाच नागझिऱ्यात वाघांच्या संख्येत वाढ होवू शकेल.

Web Title: Five Randers Hunting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.