कोविड संकटात पाच हजार मजुरांच्या हाताला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:19 AM2021-06-27T04:19:43+5:302021-06-27T04:19:43+5:30

सालेकसा : ज्यावेळी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे सर्वत्र हाहाकार माजला होता. लाॅकडाऊन काळात सर्वच उद्योगधंदे बंद पडले होते. लोकांचा रोजीरोटी ...

Five thousand laborers work in the Kovid crisis | कोविड संकटात पाच हजार मजुरांच्या हाताला काम

कोविड संकटात पाच हजार मजुरांच्या हाताला काम

Next

सालेकसा : ज्यावेळी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे सर्वत्र हाहाकार माजला होता. लाॅकडाऊन काळात सर्वच उद्योगधंदे बंद पडले होते. लोकांचा रोजीरोटी व पोटपाण्याचा प्रश्न निर्माण झाला, अशा संकट काळात सालेकसा वनपरिक्षेत्रअंतर्गत वनविभागाने तालुक्यातील आदिवासी वनक्षेत्रात गरीब गरजू लोकांना आपल्या विविध कामांतून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. जवळपास पाच हजार मजुरांच्या हाताला काम मिळण्यास मदत झाली.

सालेकसा तालुक्यात १५ हजार हेक्टरपेक्षा जास्त भूमी वनाच्छादित असून तालुक्यातील एकूण भूमीच्या एकतृतियांश भाग विविध प्रकारच्या हजारो प्रजातीच्या झाडांनी व्यापलेला आहे. तालुक्यातील जंगल शेकडो जातीच्या फळबागा, इमारती लाकूड, विविध उपयोगी दर्जेदार सागवान व इतर लाकडांसाठी प्रसिद्ध आहेत. सोबतच औषधीयुक्त एक फूल देणारे वृक्षसुद्धा भरपूर आहेत. यामध्ये तेंदूचे झाडसुद्धा असून ही झाडे लोकांना मोठा रोजगार उपलब्ध करून देणारे असतात. याशिवाय तालुक्यात बांबूचे दर्जेदार व घनदाट वन उपलब्ध असून हे सर्व संपत्ती मौल्यवान असण्याबरोबर सर्वसामान्य गरीब लोकांना पोटापाण्याचा आधार देणारेसुद्धा आहेत. कोरोना संकटात देशातील सर्व लहान-मोठे उद्योग, व्यवसाय पूर्णपणे बंद होते, तसेच लॉकडाऊन काळात लोकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले. लोकांना मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. आपल्या दैनंदिनी गरजा भागविणे कठीण झाले; परंतु याच दरम्यान सालेकसा वनपरिक्षेत्रात जवळपास ५००० मजुरांना कामाची संधी मिळाली.

..............

या कामांमधून मिळाला रोजगार

तालुक्यात नोव्हेंबर ते मार्चदरम्यान बांबू कामे, एप्रिल ते जून तेंदूपत्ता संकलन, फेब्रुवारी ते जूनदरम्यान आग प्रतिबंधक कामे, वर्षभर रोपवन कामे, हाजराफाल देखरेख आणि इतर कामे तालुक्यातील गरीब आदिवासी मजुरांना उपलब्ध करून देण्यात आली. जवळपास एक महिना तेंदूपत्ता संकलनाची कामे मिळाली. यात साडेचार हजार मजुरांना काम मिळाले. त्यांना बोनससुद्धा मिळणार आहे. सालेकसा वनविभागातर्फे मागील आठ महिन्यांत एकूण १ लाख २५ हजार दिवस काम मजुरांना लाभले. यामुळे हजारो मजुरांचा रोजगाराचा प्रश्न मिटला.

कोट.....

तालुक्याला मोठ्या प्रमाणावर वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे वनोपज देणारे जंगल लाभले असून या माध्यमातून शासनाला लाभ मिळतो. सोबतच स्थानिक लोकांना रोजगारसुद्धा मिळतो. अशात वनांचे रक्षण करण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे.

-अभिजित ईलमकर, वनपरिक्षेत्राधिकारी, सालेकसा.

कोट.....

परिसरातील जंगलात तेंदूपत्ता संकलनासह इतर वनोपज संकलन आणि बांबू कटाई, तसेच हाजराफाल परिसरात वर्ष रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे कामासाठी बाहेर जाण्याची गरज भासत नाही.

-रामदीन उईके, नवाटोला, सालेकसा.

Web Title: Five thousand laborers work in the Kovid crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.