एकस्तर वेतनश्रेणीनुसार वेतन निश्चिती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 09:26 PM2019-04-18T21:26:58+5:302019-04-18T21:27:29+5:30
गोंदिया जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची वेतन निश्चिती एकस्तर वेतनश्रेणीनुसार करण्यात यावी. यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना जिल्हा शाखेच्या वतीने जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी यांच्याशी चर्चा करुन बुधवारी (दि.१७) निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडेगाव : गोंदिया जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची वेतन निश्चिती एकस्तर वेतनश्रेणीनुसार करण्यात यावी. यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना जिल्हा शाखेच्या वतीने जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी यांच्याशी चर्चा करुन बुधवारी (दि.१७) निवेदन देण्यात आले.
शासन सेवेत २००५ नंतर रुजू झालेल्या नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती करताना ती एकस्तर वेतनश्रेणी शिवाय केल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतन विद्यमान वेतनापेक्षा कमी होते. ही वस्तूस्थिती मुकाअ यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
या वेळी मुकाअ दयानिधी यांनी शिक्षणाधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्यासोबत चर्चा करुन ही समस्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप सोमवंशी, जिल्हाध्यक्ष राज कडव, जिल्हा सचिव सचिन राठोड, जिल्हा कोषाध्यक्ष प्रवीण सरगर,जिल्हा सहकार्याध्यक्ष मुकेश राहांगडाले, शीतल कनपटे, सदाशिव पाटील, संदीप तिडके, सुमित चौधरी, सचिन सांगळे, गणेश कांगणे, किशोर ब्राम्हणकर, बाबासाहेब होनमाने, भूषण जाधव, मिथुन चव्हाण, जीवन आकरे, तेजराम नंदेश्वर, रमेश उईके, संजय उके, सोमेश्वर वंजारी, डी.टी.कावळे, क्रांतीलाल पटले, अजित रामटेके, अनमोल उके, अमोल खंडाईत, पी.एस.राहांगडाले, तानाजी डावखरे, प्रकाश परशुरामकर, महेन्द्र चव्हाण, रोहित हत्तीमारे, अश्विन भालाधरे, चंद्रशेखर ब्राम्हणकर, लोकेश नाकाडे, अंजन कावळे, सुरज राठोड, सतिश बिट्टे, सुरेश मुधोळकर, रावसाहेब सिदने, किशोर डोंगरवार, हुमेंद्र चांदेवार उपस्थित होते.